आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीचा खास होता हा नागपूरचा क्रिकेटर, एकेकाळी धवनसोबत करायचा ओपनिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - राइड हॅन्ड बॅट्समन इंडियन क्रिकेटर फैज फजल आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. 7 सप्टेंबर 1985 रोजी नागपूरमध्ये जन्मलेला फैज देशांतर्गत क्रिकेटमध्ये अतिशय यशस्वी ठरला. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने केवळ एकच वनडे सामना खेळला आहे. एकेकाळी तो शिखर धवनसोबत ओपनिंग करत होता. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्याला धवनसोबत ओपनिंगवर खेळण्याची संधी मिळाली. मात्र, नशीबाने त्याची साथ दिली नाही. 
 
 
वर्ल्डकपमधून असा झाला बाहेर
- फैज फैजल 2004 मध्ये बांग्लादेशात झालेल्या अंडर-19 वर्ल्डकपसाठी निवडला गेला. त्याला शिखर धवनसोबत ओपनिंग बॅट्समन म्हणून ठेवण्यात आले होते. मात्र, टूर्नामेंटच्या ऐनवेळी तो जखमी झाला आणि टीममधून बाहेर पडावे लागले.
 

शिल्पा शेट्टीचा खास
- 2010 आणि 2011 च्या आयपीएलमध्ये फैज राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता. बॉलिवुड अभिनेत्री आणि टीमची को-ओनर शिल्पा शेट्टीचा तो खास मानला जात होता. मात्र, 2011 च्या आयपीएल सीजननंतर त्याला कुठल्याही संघाने खरेदी केले नाही. आयपीएल 2016 मध्ये फैजचा बेस प्राइस फक्त 10 लाख होता. 
 

केवळ एकच ODI
- 2003 मध्ये विदर्भ रणजी ट्रॉफीत आपला फर्स्ट क्लास डेब्यू करणाऱ्या फजलच्या नावे 89 सामन्यात सरासरी 39.03 प्रमाणे 5894 धावा आहेत. त्यामध्ये 11 सेन्चुरी आणि 31 हाफ सेन्चुरींचा समावेश आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असताना सुद्धा नशीबाने त्याची साथ दिली नाही असेच म्हणावे लागेल.
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फॅक्ट्स आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...