आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी संघाला चालू सिरीजमध्ये फिक्सिंगची ऑफर, सरफराजचा धक्कादायखक खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्‍तानी क्रिकेट टीमचा कॅप्टन सरफराज अहमदने धक्कादायक खुलासा केला आहे. दुबईत सुरू असलेल्या श्रीलंका विरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये एका दलालाने त्याची भेट घेतली. तसेच स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी पैश्यांची ऑफर दिली. सरफराजने सांगितल्याप्रमाणे, त्याने ती ऑफर नुसती धुडकावून लावली नाही. तर याची तक्रार भ्रष्टाचार विरोधी दल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिली.
 
>> पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, सरफराजविषयी सर्वांच्या मनात खूप आदर आहे. त्याने खेळाडू आणि कॅप्टन म्हणून इतरांसमोर आदर्श प्रस्थापित केले आहे. भ्रष्टाचाराच्या समस्येला कसे आळा घालतात याचे त्याने आपल्या सहकाऱ्यांसमोर एक उदाहरण प्रस्तुत केले आहे.
>> या घटनेनंतर पाकिस्तानी क्रिकेट व्यवस्थापनात खळबळ उडाली. अख्खे व्यवस्थापन चमू दुबईत असून ते या घटनेचा आढावा घेत आहेत.
>> फलंदाज शरजील खान आणि खालिद लतीफवर स्पॉट फिक्सिंगमुळे प्रतिबंध लागले आहेत. या प्रतिबंधांमुळे स्पॉट फिक्सिंगचे प्रयत्न थांबतील अशी अपेक्षा केली जात असतानाच पाकिस्तानी कर्णधाराने हा खळबळजनक खुलासा केला.
 

 
बातम्या आणखी आहेत...