आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषकात पाकचा थेट प्रवेश अवघड; पात्रता फेरीत खेळावे लागण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- जगातील नंबर वन कसाेटी टीमचा बहुमान मिळवणाऱ्या पाकिस्तानला अापल्या वनडे इतिहासात वाईट दिवसांना सामाेरे जावे लागत अाहे. साेमवारी जाहीर झालेल्या अायसीसीच्या क्रमवारीमुळे तर अाता पाकची अागामी २०१९ विश्वचषकातील थेट एंट्रीही अडचणीत सापडली अाहे.

विश्वचषकात खेळण्याच्या अापल्या अाशा कायम ठेवण्यासाठी पाकला निश्चितपणे असाेसिएट्स संघाविरुद्ध क्वालिफायर खेळावे लागेल. ४१ वर्षांच्या वर्ल्ड कप इतिहासात प्रथमच कसाेटी टीमला क्वालिफाइंग राउंडमध्ये खेळावे लागेल.

पाकिस्तान ताज्या रँकिंगमध्ये ८६ रेटिंगसह नवव्या स्थानावर अाहे. अायसीसीच्या २००१ मध्ये सुरू झालेल्या रँकिंग प्रणालीत पाकची ही सर्वात सुमार रँकिंग ठरली अाहे. कारण क्रमवारीतील अव्वल अाठ संघांना विश्वचषकात थेट प्रवेश दिला जाताे. या अाठ संघांचा निर्णय अाता ३० सप्टेंबरला जाहीर हाेणाऱ्या क्रमवारीवर अवलंबून अाहे. तसेही पाककडे अापल्या क्रमवारीतील स्थान सुधारण्यासाठी वर्षभराचा कालावधी अाहे.

येत्या ३० मे २०१९ पासून इंग्लंडमध्ये विश्वचषकाला सुरुवात हाेणार अाहे. याचे पात्रता फेरीतील सामने मार्च २०१८ पासून बांगलादेशात हाेतील. विश्वचषकात १० संघ सहभागी हाेतील.

विंडीज,बांगलादेश सरस
भारतासह सहा संघ हे १०० पेक्षा अधिक रेटिंगमुळे टाॅप-६ मध्ये अाहेत. बांगलादेश (९८) विंडीज (९४) हे अनुक्रमे सातव्या अाठव्या स्थानी अाहेत. म्हणजेच दाेन स्थानांसाठी पाकचा सामना या टीमसाेबत असेल. पुढच्या वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत पाकला १६, विंडीजला १७ अाणि बांगलादेशला १२ सामने खेळावे लागणार अाहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीतून विंडीज बाहेर
विंडीज अागामी चॅम्पियन्स ट्राॅफीत खेळणार नाही. कारण टाॅप-८ संघ यात खेळतात. याच्या पात्रतेची मुदत ही ३० सप्टेंबर २०१५ हाेती. त्या वेळी विंडीज संघ व्या स्थानी हाेता.
> विंडीज १७ मधील ११ सामने घरच्या मैदानावर खेळेल. यात निम्म्या विजयांनी विंडीजचे रेटिंग ९० पेक्षा अधिक राहील.
> बांगलादेश सामने विदेशात सामने घरच्या मैदानावर खेळेल. चार विजयांनी रेटिंग ९० पेक्षा अधिक हाेईल.
> पाक १६ पैकी सामने अाॅस्ट्रेलियात खेळणार. हरल्यास रेटिंग ८६ पेक्षा कमी हाेईल. सामने बांगलादेशशी. जिंकल्यास रेटिंग वाढेल. लढती विंडीजशी.६-७ विजयाने गुणांचा फायदा. म्हणजेच एकूण रेटिंग ९० पेक्षा कमी.

समजण्यापलीकडे रँकिंग
>अाम्ही नवव्यास्थानी अाहाेत. असे काय झाले हे समजण्यापलीकडे अाहे. अाम्हाला अनेक स्पर्धा खेळायच्या अाहेत. क्वालिफायरविनाच विश्वचषकात थेट प्रवेशाची अाशा अाहे.
-मिकी अाॅर्थर, काेच, पाक
बातम्या आणखी आहेत...