आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 लढतीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर- एकमेव टी-२० लढतीत पाकिस्तानने इंग्लंडवर गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत बाद १३५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १४.५ षटकांत एक गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. गोलंदाज वहाब रियाजने बळी घेतले. तोच सामनावीर ठरला.

पाकिस्ताकडून सलामीवीर शार्जिल खान आणि खालिद लतीफने अर्धशतकी खेळी करत १०७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. शार्जिलने ३६ चेंडूंत चौकार आणि षटकार लगावत ५९ धावा केल्या. शार्जिलला हसन अलीकरवी झेलबाद करत रशीदने त्याचा अडथळा दूर केला. लतीफने ४२ चेंडूंत चौकार आणि षटकार खेचत नाबाद ५९ धावांची खेळी केली. बाबर आझमने नाबाद १५ धावांचे योगदान िदले. तत्पूर्वी इंग्लंडकडून रॉयने २१, तर हेल्सने सर्वाधिक ३७ धावा केल्या. ज्याेस बटलरने १६, तर इयान मॉर्गनने १४ धावा जोडल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली.
पाकिस्तानकडून इमाद वसीम आणि हसन अलीने प्रत्येकी गडी बाद केले. वहाब रियाजने १८ धावा देत फलंदाज तंबूत पाठवले.
बातम्या आणखी आहेत...