आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावर व्हायरल झाली PAK क्रिकेटरच्या मृत्यूची बातमी, द्यावे लागले स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमलला ट्विटरवर जिंवत असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. त्याचे कारण म्हणजे एका अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर सोशल युजर्सने अकमल लवकरात लवकर बरा होण्यासाठी दुवा मागितली. मात्र काही वेळाने श्रद्धांजलीचा पाऊस पडायला लागला. त्यानंतर अकमलला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. ट्विट करून अकमल म्हणाला की, मी ठणठणीत असून सध्या लाहोरमध्ये आहे. 

 

अपघाताचा फोटो झाला होता व्हायरल...
- दरम्यान एका व्यक्तीच्या अपघाताचा फोटो सोशल मीडियावर आला. त्याचा चेहरा अकमलशी मिळताजुळता होता. हा फोटो काहींनी अकमलच्या फोटोसोबत शेअर केला. 
- जेव्हा ही बातमी अकमलपर्यंत पोहोचली. तेव्हा अकमलने यासंदर्भात ट्विट केले. या ट्विटमध्ये म्हटले की, मी एकदम सुरक्षित आहे. लाहेारमध्ये असून सोशल मीडियावरील बातम्या खोट्या आहेत. लवकरच मी नॅशनल 20 कप 2017 मध्ये दिसणार आहे.
- उल्लेखनीय बाब म्हणजे अकमल सध्या पाकिस्तानी क्रिकेट संघापासून दूर आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खोट्या बातम्या...

बातम्या आणखी आहेत...