आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PepsiCo क्रिकेटच्‍या पिचवर परतली, BCCI सोबत चार वर्षांसाठी नवा करार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - स्‍पॉट फिक्सिंगमुळे आयपीएलच्‍या स्पॉन्सरशिपपासून बाजूला झालेली पेप्सीको आता पुन्‍हा क्रिकेटच्‍या मैदानात दिसणार आहे. या कंपनीने बीसीसीआयसोबत पुढील चार वर्षांसाठी नवीन करार केल्‍याची माहिती गुरुवारी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर आणि पेप्सीकोचे चेयरमॅन तथा सीईओ डी. शिवकुमार यांनी संयुक्‍त पत्रकार परिषदेत दिली.
काय आहे नवीन करार ...
- बीसीसीआयसाठी पुढील चार वर्षांपर्यंत पेप्सी ड्रिंक्स आणि स्‍नॅक्स स्पॉन्सर करणार आहे.
- ती भारतात होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय सामन्‍यांसाठी असेल.
- या संदर्भात बीसीसीआयचे सचिन अनुराग ठाकूर म्‍हणाले, ''ज्‍या दिवशी कंपनी आयपीएलपासून दूर झाली त्‍या दिवशी त्‍यांनी सांगितले होते की, कोणत्‍या ना कोणत्‍या माध्‍यमातून आम्‍ही बीसीसीआयसोबत जरूर जुळवून घेऊ.
फिक्सिंगमुळे पेप्सी झाली होती बाजूला
- यापूर्वी पेप्सी ब्रँड इंडियन प्रीमयर लीगच स्पॉन्सर होता. परंतु, वर्ष 2013 च्‍या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आयपीएलपासून कंपनीला दूर व्‍हावे लागले होते.
- स्‍पर्धेदरम्‍यान होत असलेल्‍या स्‍पॉट फिक्सिंगमुळे आयपीएलची प्रतिमा मलीन झाल्‍याने आपण दूर झाल्‍याचे वर्ष 2015 मध्‍ये पेप्सीने सांगितले होते.
- विशेष म्‍हणजे 2013 ते 2017 पर्यंत पेप्सिकोने टाइटल स्पॉन्सरशिपसाठी 396 कोटी रुपये मोजले होते.
- ऑक्‍टोबर 2015 मध्‍ये वीवो मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीएलची नवीन स्पॉन्सर झाली.