आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या विजयाचा हीरो ठरला कर्णधार सर्फराज, अशी आहे पर्सनल Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्फराज अहमदच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. श्रीलंकेवर 3 विकेटनी रोमांचक विजय मिळवल्यावर पाकिस्तानी कर्णधार प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. याप्रसंगी वाचकांसाठी divyamarathi.bhaskar.com ची सर्फराज अहमदबद्दल ही खास माहिती...
 
अचानक मिळाली पदार्पणाची संधी...
सर्फराजचा जन्म 22 मे 1987 रोजी पाकच्या कराचीत झाला होता. सर्फराजने लहानपणापासूनच क्रिकेट खेळणे सुरू केले होते, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे नशीब 2007मध्ये फळफळले. 18 नोव्हेंबर 2007 रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या वनडे सिरीजमध्ये त्याला अचानक जखमी कामरान अकमलच्या जागी संघात घेण्यात आले. या पदार्पणाच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी नाही मिळाली कारण पाकने हा सामना अगोदरच जिंकला होता. तथापि, यानंतर त्याला एशिया कपमध्ये पुन्हा एकदा संघात घेण्यात आले. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये सर्फराजने चांगल्या परफॉर्मन्सच्या जोरावर पाक संघात महत्त्वाची जागा बनवली.
 
लग्नानंतर नशीब जोरावर...
-सर्फराजने 2015मध्ये सय्यदा खुशबख्तशी लग्न केले. सय्यदाने कराचीमधून बीई इलेक्ट्रॉनिक्स केले आहे. लग्नानंतर सर्फराजचे नशीब चमकले आणि त्याला संघात मोठी जबाबदारी देण्यात आली. सर्फराज म्हणतो, त्याच्या करिअरमध्ये त्याच्या पत्नीचा भक्कम पाठिंबा राहिलेला आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, धोनीची चाहती आहे सर्फराजची पत्नी आणि त्यांचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...