आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनने बदलली पालघरच्या या क्रिकेटरची LIFE, जर्सी नंबरही एकच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनचे नंबर पाहूण फॅन्स शार्दुलवर संतप्त झाले होते. - Divya Marathi
सचिनचे नंबर पाहूण फॅन्स शार्दुलवर संतप्त झाले होते.
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा उगवता स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर सोमवारी (16 ऑक्टोबर) रोजी आपला 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. न्युझीलंडविरुद्ध वनडे सिरीजसाठी नुकतीच टीमची घोषणा झाली असून त्यामध्ये शार्दुलचे नाव आहे. यापूर्वी त्याने श्रीलंका विरोधात वनडे सिरीज खेळली आहे. शार्दुल पालघर येथील रहिवासी असून त्याने इंडिया-ए आणि मुंबईकडूनही क्रिकेट खेळले आहे.
 
सचिनच्या सल्ल्याने बदलली लाइफ...
>> शार्दुल क्रिकेटमध्ये एक फास्ट बॉलर म्हणून आपले करिअर बनवण्याचा प्रयत्न करत होता. 2012 मध्ये त्याचे वजन वाढून तब्बल 83 किलो झाले होते. 
>> डेब्यू सीजनमध्ये त्याच्या बॉलिंगपेक्षा वजनाची चर्चा जास्त होती. त्यावेळी शार्दुलला अनेकांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला. पण, कुणाच्याही सल्ल्याचा त्यावर परिणाम झाला नाही. 
>> याच दरम्यान त्याची भेट मास्टर ब्लास्टर सचिनशी झाली. त्याचवेळी, तुला क्रिकेटमध्ये करिअर घडवायचे असेल तर सर्वप्रथम फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे लागेल. 
>> सचिनने समजावून सांगितल्यानंतरच शार्दुलला फिटनेसचे महत्व कळाले. यानंतरच त्याने आपले वजन चक्क 13 किलोंनी कमी केले. 
 
जेव्हा सचिनच्या नंबरची जर्सी घालणे पडले महाग
- शार्दुल ठाकूरने याच वर्षी 31 ऑगस्ट रोजी भारत आणि श्रीलंका विरुद्ध कोलंबो येथे झालेल्या चौथ्या वनडेमध्ये डेब्यु केले. डेब्यू मॅचमध्ये त्याने 10 नंबरची जर्सी घातली होती. 
- शार्दुलच्या जर्सीचा क्रमांक पाहूण भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड नाराज झाले. सोशल मीडियावर फॅन्सने आपला संताप व्यक्त केला होता. सचिन आपल्या कारकिर्दीत 10 नंबरची टी-शर्ट घालत होता. तो फॅन्ससाठी भावनिक होता. 
- अनेकांनी त्याला ट्रोल करून पुन्हा या नंबरची जर्सी घालू नको असे सांगितले होते.
- शार्दुलने आपल्या करिअरमध्ये दोन वनडे सामने खेळले आहेत. श्रीलंकाविरुद्ध झालेल्या या सामन्यांत त्याने 1 विकेट घेतली होती. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शार्दुलने यामुळे घातले होते 10 नंबरचे टी-शर्ट, आणखी काही फोटो...
बातम्या आणखी आहेत...