आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या मैत्रिणीसोबत ललित मोदींनी थाटलेय लग्न, आहेत अब्जाधीश गुजराती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या ललित मोदी प्रकरणावरुन भाजपचे अनेक वरिष्ठ नेते गोत्यात आले आहे. सुषमा स्वराज तर कॉंग्रेसचा टार्गेट झाल्या आहेत. आयपीएलची संकल्पना साकार करणारे ललित मोदी एक मोठे बिझनेसमन आहेत. आम्ही आपल्यासाठी त्यांच्या आयुष्यातील अतिशय रंजक माहिती घेऊन आलोय.

ललित मोदी यांच्या क्रिकेट पॉलिटिक्सप्रमाणेच खासगी आयुष्य रंजक आहे. विदेशात पदवी घेत असताना ललित यांचा जीव त्यांच्या आईची मैत्रिण मीनलवर आला. मीनल ललितपेक्षा नऊ वर्षांनी मोठी होती. तरीही दोघांमधील नाते संबंध संपुष्टात आले नाही.परंतु, मीनलने नायजेरियाचा उद्योजक जॅक सागरानी याच्यासोबत लग्न केले. या लग्नाच्या अगदी काही दिवसांपूर्वी ललित यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर मीनल भडकली होती. त्यानंतर तिने तब्बल चार वर्ष ललित यांच्यासोबत बोलणे बंद ठेवले.

मीनल आणि सागरानी बरेच दिवस एकत्र राहू शकले नाहीत. दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ललित आणि मीनल पुन्हा जवळ आले. त्यांच्या या नात्याला ललित यांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड विरोध झाला. परंतु, ललित यांनी माघार घेतली नाही. 17 ऑक्टोबर 1991 रोजी त्यांनी लग्न केले. मीनलला आधीच्या लग्नातून एक मुलगी होती. तिचे नाव करीमा आहे. ललित यांनी तिला स्विकारले. तिचे लग्न गौरव बर्मन याच्यासोबत लावून दिले. डाबर ग्रुपचे मालक विवेक बर्मन आणि मोनिका बर्मन यांचा तो मुलगा आहे. गौरवचा भाऊ मोहित बर्मन किंग्ज इलेव्हन पंजाबचा कोओनर आहे.ललित आणि मीनल यांना झालेल्या मुलाचे नाव रुचिर आहे. त्यांना आलिया नावाची मुलगीही आहे. ती स्वीत्झर्लंडमध्ये पदवी घेत आहे. रुचीर लंडनमध्ये शिक्षण घेतोय.

पुढील स्लाईडवर बघा, ललित मोदी यांच्या खासगी आयुष्याचे आणि कुटुंबाचे UNSEEN PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)