आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: फिरकीपटू प्रग्यान ओझाच्या डोक्याला चेंडू लागला; गंभीर जखमी, उपचार सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोक्याला मागील बाजूस जोरात चेंडू लागताच प्रग्यान ओझा मैदानात असा पडला. - Divya Marathi
डोक्याला मागील बाजूस जोरात चेंडू लागताच प्रग्यान ओझा मैदानात असा पडला.
ग्रेटर नोएडा- दुलीप ट्राॅफीत इंडिया ब्ल्यू आणि इंडिया ग्रीन यांच्यातील सामन्यादरम्यान बुधवारी भारताचा डावखुरा फिरकीपटू प्रज्ञान ओझाच्या डोक्याला चेंडू लागला. यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंडिया ब्ल्यूच्या दुसऱ्या डावादरम्यान ६३ व्या षटकात ही घटना घडली.

त्या वेळी इंडिया ग्रीनकडून मिड ऑनवर क्षेत्ररक्षण करत असलेला ओझा चेंडू रोखण्यासाठी वाकला. मात्र, चेंडू अचानक उसळून त्याच्या डोक्याला लागला. श्रेयस गोपालच्या चेंडूवर इंडिया ब्ल्यूच्या पंकज सिंगने हा फटका मारला होता. चेंडू डोक्याला लागल्यानंतर प्रज्ञान ओझा मैदानावर कोसळला. त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी झाल्यानंतर त्याची प्रकृती बरी असल्याचे बीसीसीआयने िट्वट करून सांगितले. पहिल्या डावात ओझा एकही विकेट घेऊ शकला नाही.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, प्रग्यान ओझाला कसा लागला चेंडू...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...