आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या खेळाडूने रचना नवा इतिहास, गाठू शकतो सचिन तेंडुलकरचा विक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - मुंबईचा 18 वर्षाचा क्रिकेटर पृथ्वी शॉने एक नवा इतिहास रचला आहे. त्यामुळे आता पृथ्वी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. शुक्रवारी पृथ्वीने रणजी सामन्यात आंध्रप्रदेश विरूद्ध खेळतांना पहिल्या श्रेणीत पाचवे शतक केले. पृथ्वीने कमी वयात आंतरराष्ट्रीय सामने खेळून क्रिकेटमध्ये नवे विक्रम प्रस्थापित केले.

 

पृथ्वीने आतापर्यंत 7 प्रथम श्रेणीच्या सामन्यात 5 शतक ठोकले आहेत. आंध्रप्रदेश विरूद्ध खेळतांना त्याने 65.90 च्या स्ट्राईक रेटने 173 चेंडूत 114 धावा केल्या. अयप्पा बंडारूच्या चेंडूवर यष्टीचित होऊन तंबूत परतावे लागले. सचिनने 18 वर्षाच्या वयात एकूण 7 शतक ठोकले होते. आता पृथ्वी त्या विक्रमाच्या दोन शतकांनी मागे आहे. 

 

नुकतेच पृथ्वीने ओडिशाविरूद्ध खेळतांना रणजी ट्रॉफी ग्रुप सी क्रिकेट सामन्यात 153 चेंडूत 18 चौकारच्या मदतीने 105 धावा केल्या होत्या. त्याचवेळी अजिंक्य रहाणेने दुसऱ्या विकेटसाठी 136 धावांची पार्टनरशीप केली होती. पृथ्वी सातत्याने चांगली फलंदाजी करीत टीम इंडियात आपला प्रवेश मजबूत करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...