आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्‍ये 2 नवीन संघ, १६ कोटींत पुण्याची तर १० कोटीं राजकोटची बोली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पुणे आणि राजकोटच्या टीम इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढच्या दोन सत्रांत २०१६ आणि २०१७ साठी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होतील. या दोन्ही संघांना चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या जागी सामील करण्यात आले आहे.

संजीव गोयंका मालक असलेली न्यू रायजिंग कंसोर्टियमने पुणे टीम तर नरेंद्र बंसल हे मालक असलेली मोबाइल निर्माता भारतीय कंपनी इंटेक्सने राजकोट टीम खरेदी केली आहे. न्यू रायझिंगने १६ कोटी रुपयांपेक्षा कमी आणि इंटेक्सने १० काेटी रुपयांपेक्षा कमीची रिव्हर्स बोली लावून नव्या फ्रँचायझी टीम खरेदी केल्या.

हे दोन्ही नवे संघ पुणे आणि राजकोट आयपीएलच्या पुढच्या सत्रात २०१६ आणि २०१७ मध्ये आयपीएलमध्ये सहभागी होतील. दिल्लीत मंगळवारी आयपीएलच्या संचालन परिषदेच्या बैठकीत नव्या टीम आणि त्यांच्या मालकांची घोषणा करण्यात आली. पुणे आणि राजकोट चेन्नई आणि राजस्थान रॉयल्सची जागा घेतील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या वेळी सांगितले.

पाच कंपन्यांनी लावली बोली
आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. दोन नव्या टीमसाठी पाच जणांनी बोली लावली. बोली लावणाऱ्यांची नावे अशी आहेत. १. इंटेक्स, राजकोट. २. न्यू रायझिंग कंसोर्टियम, पुणे. ३. चेत्तीनाड, चेन्नई. ४. हर्ष गोयंका, आरपीजी ग्रुप. ५. हर्ष गोयंका यांची फार्मा कंपनी.

आधार मूल्य ४० कोटी रु. होते
रिव्हर्स बोलीत दावेदारांना आयपीएलकडून आधार मूल्य ४० कोटी रुपये कमीत कमी पासून बोली लावायची होती. याचा अर्थ बीसीसीआय आपल्या सेंट्रल आय कोटयातून नव्या मालकाला अधिकाधिक ४० कोटी रुपये देईल. बोलीत ज्या दावेदारांकडून कमीत कमी बोली लावण्यात आली, त्यांना फ्रँचायझी अधिकार मिळाले.
बंसल यांचे इंटेक्स ग्रुप
राजकोटची टीम खरेदी करणारे नरेंद्र बंसलने १९९६ मध्ये इंटेक्स टेक्नॉलॉजी कंपनीची सुरुवात केली. ते कंपनीचे फाउंडर आणि सीएमडी आहेत.
ड्रॉफ्ट सिस्टिमने होणार नव्या संघांची बोली

दोन्ही संघांसाठी कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंची बोली ड्रॉफ्ट सिस्टिमनुसार होईल. चेन्नई आणि राजस्थानचे प्रत्येकी पाच कॅप्ड खेळाडू (महेंद्रसिंग धोनी, जडेजा, अश्विन, रहाणे, सुरेश रैना, आदी.) यांना दोन्ही टीम क्रमाने खरेदी करतील. यानंतर उर्वरित ४० खेळाडूंवर बोली लागेल.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोण आहेत संजीव गोयंका ?, आयपीएल-९ बाबत हे आहे महत्त्वाचे...