आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीअाय ताेडण्याच्या प्रयत्नाची शंका: अजय शिर्के

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बीसीसीअायचे काम बघून जगभरातील अनेक संस्था अामच्यासारखे काम करण्याचा संकल्प करतात. अन दुसरीकडे वेगवेगळ्या मार्गाने बीसीसीअाय ताेडण्याचे काम सुरु अाहे का ? अशी शंका वाटते.

काेणत्याही परिस्थितीत भूकंप हाेऊ नये, अशी अपेक्षा असली तरी काय हाेईल ते सांगता येत नाही, अशा शब्दात बीसीसीअायचे नूतन सचिव अजय शिर्के यांनी भविष्यातील क्रिकेट बदलांबाबत त्यांची मते मांडली. नाशिक जिल्हा क्रिकेट असाेसिएशनच्या वतीने बीसीसीअायचे सचिव अजय शिर्के यांचा विशेष मानपत्र देऊन सत्कार करण्यात अाला.

अध्यक्षांसह संपूर्ण टीमने एकमेकांसाेबत काम केले. तसेच जुन्या-नव्यांच्या उत्कृष्ट समन्वयाने यापुढेही चांगले काम हाेईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे संघटनेअंतर्गत अाव्हाने नसून लाेढा समितीच्या शिफारशींबाबत अंतिम काय निर्णय हाेताे, त्यावरच बरेच अवलंबून राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गाेव्या संदर्भातकठाेर निर्णय : काहीलाेकांच्या चुकांमुळे बीसीसीअाय बदनाम हाेते. त्यांच्यामुळे सगळ्यांच्या कामाबाबत शंका घेतली जाते. त्यामुळे अशा लाेकांबाबत किंवा गाेव्यातील भ्रष्टाचाराबाबत कठाेर निर्णय घेण्याचे ठरवले असून तसा निर्णयच घेतलेला अाहे. ताे निर्णय लवकरच तुम्हाला कळेल, असेही शिर्के यांनी नमूद केले.

सर्वाेत्तम प्रशिक्षक हाच निकष : प्रशिक्षकनिवडीची जबाबदारी सचिन, साैरभ गांगुली अाणि अनिल कुंबळेंकडे अाहे. त्यात कुणाचाही हस्तक्षेप राहणार नाही. त्यांच्या समन्वयाची जबाबदारी संजय जगदाळेंकडे साेपविण्यात अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...