आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahane Gives Lord Century's Credit To Vengasarkar

वेंगसरकर यांच्यामुळे लाॅर्ड‌्सचे शतक शक्य, अजिंक्य रहाणेने व्यक्त केल्या भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘दिलीप वेंगसरकर यांना मी कधीही विसरणार नाही, कारण त्यांच्यामुळेच माझे लॉर्ड‌्सवर शतक झळकले होते. हे माझे शतक झाले, त्यापूर्वी आदल्या दिवशीच लॉर्ड‌्सवर दिलीपसर मला भेटले होते. त्यांनी मला लॉर्ड‌्सवर कसे खेळायचे याच्या काही ‘टिप्स’ दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना त्या उपयोगी पडल्या’, झिम्बाब्वे दौऱ्यावर निघालेल्या भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान मुंबईकर अजिंक्य रहाणे आज बीकेसी येथे ‘फिटनेस’ सरावादरम्यान बोलत होता.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अजिंक्यला त्यावेळी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. वेंगसरकर अजिंक्यला म्हणाले, "कप्तानपदाच्या जबाबदारीचे दडपण तुझ्या वैयक्तिक कामगिरीवर येऊ देऊ नकोस, तू शांत व संयमी आहेस. मात्र नेतृत्वाची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे त्याचे दडपण येणार नाही हे लक्षात ठेव. तुझी स्वत:ची कामगिरी चांगली होणे गरजेचे आहे. तुझा फॉर्म महत्वाचा ठरेल.'

वेंगसरकरांच्या टिप्स
माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अजिंक्यला काही सावधानतेच्या गोष्टीही सांगितल्या. ते अजिंक्यला म्हणाले, "झिम्बाब्वेचा हा छोटेखानी दौरा आहे, त्यामुळे सेट व्हायला थोडा वेळ लागेल. मात्र उतावळेपणाने संयम सोडू नकोस. चेंडू बघून ताळमेळ जमव, नंतर प्रहार कर. धावा चांगल्या जमतील.'