आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raipur, Kanapur, Vishakhapattanam As Franchise Options

फ्रँचायझींपुढे अाता रायपूर, कानपूर, विशाखापट्टणमचे पर्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या १ मेनंतरचे महाराष्ट्रातील सामने राज्याबाहेर हलवण्याच्या निर्णयानंतर बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींची धावपळ सुरू झाली असून आता काय करायचे, या गहन प्रश्नाचे उत्तर सोडवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. आयपीएल कौन्सिलने या तीन फ्रँचायझींपुढे रायपूर, कानपूर आणि विशाखापट्टणम हे तीन पर्याय ठेवल्याची माहिती आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली.

दरम्यान, पुण्याच्या फ्रँचायझीने आणि यजमान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने २९ एप्रिलच्या सामन्यानंतर एक मे रोजी होणारा सामना आयोजित करण्याची परवानगी द्यावी, यासाठी शुक्रवारी न्यायालयात अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.
राजीव शुक्ला यांनी अन्य फ्रँचायझींच्या केंद्रावर मुंबई, पुणे, नागपूर फ्रँचायझींचे सामने आयोजित करण्याची शक्यता फेटाळून लागली. ते म्हणाले, प्रत्येक फ्रँचायझीने आपले शहर, आपले स्टेडियम निश्चित करताना काही गोष्टींची खूणगाठ मनात बांधली होती. प्रत्येक संघाचे त्या त्या शहराशी, लोकांशीही भावनिक नाते निर्माण झालेले असते. स्टेडियम पूर्णपणे रंगवून, त्यावर त्या संघाचा ठसा उमटवण्यात आलेला असतो.
रांची, इंदूरला नापसंती : फ्रँचायझींनी रांची व इंदूरमध्ये सामना ठेवण्यास नापसंती दर्शवली. कारण रांचीत तिकिटांची विक्री फारशी हाेत नाही. तसेच मध्य प्रदेशात कुंभमेळा अाहेे. त्यामुळे सामने अायाेजित करण्यास त्यांनी नकार दिला अाहे.
‘त्या’ टीमची असेल पसंती
अंतिम सामन्याचाही प्रश्न निर्णायक ठरणार आहे. गतविजेत्यांच्या शहरात अंतिम सामना आयोजित करण्यात येतो. जो संघ अंतिम फेरीत पोहोचतो त्यांचे मतही याबाबतीत विचारात घेतले जाते. त्यामुळे अंतिम ४ जणांमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांपैकी एकाच्या केंद्राची अंतिम सामन्यासाठी निवड होऊ शकेल.