आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री, 6 तासांच्या घडामोडीनंतर विराट पसंतीवर मोहोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. मंगळवारी सुमारे सहा तास नाही-हो करत अखेर शास्त्रींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. इंग्लंडमध्ये सन २०१९मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत शास्त्री प्रशिक्षक असतील. तर जहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शिवाय, संघाच्या परदेश दौऱ्यात राहुल द्रविड फलंदाजी कोच असेल.
 
मंगळवारी सायंकाळी ४ वाजता शास्त्रींच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीची घोषणा झाली. मात्र, तासाभरात बीसीसीआयने या बातमीचे खंडन केले. अखेर रात्री १० वाजता अधिकृतरीत्या शास्त्रींच्या नावाची घोषणा करण्यात आली. मुंबईत सोमवारी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर व व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने शास्त्री, वीरेंद्र सेहवाग यांच्यासह पाच जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासन समितीने मंगळवारीच प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करावी, असे निर्देश दिले होते. 
 
रवी शास्त्री यांची कारकीर्द
अांतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत रवी शास्त्री यांची कारकीर्द उल्लेखनीय हाेती.  रवी शास्त्री यांनी फेब्रुवारी १९८१ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अांतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली हाेती. या सामन्यात त्यांनी दहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली हाेती. मात्र, अापल्या काैशल्याच्या जाेरावर अवघ्या १८ महिन्यांत त्यांनी भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज म्हणून अापले स्थान पक्के केले हाेते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या २५ वर्षांनंतरही भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद मिळवून त्यांनी अापल्या काैशल्याचा ठसा कायम ठेवला अाहे. गेल्या वर्षीच शास्त्री यांना ही जबाबदारी घेण्याची इच्छा हाेती. मात्र त्यावेळी अनिल कुंबळे यांची वर्णी लागली. मात्र बारा महिन्यांतच हे पद मिळविण्यात शास्त्री यशस्वी ठरले.
 
शास्त्री संचालक असताना  टीम इंडियाची कामगिरी
- कसोटी १२ लढती, विजयी ५, पराभूत ३, ड्रॉ ४
- एकदिवसीय ४३ सामने, २७ जिंकले, १५ पराभूत 
- टी २० मध्ये २३ सामने, १५ विजय, ८ पराभव
 
सेहवाग कमी पडला
या पदासाठी शास्त्रींसह लालचंद राजपूत, टॉम मूडी, वीरेंद्र सेहवाग, पायबस यांनी मुलाखती दिल्या हाेत्या. शास्त्री व सेहवाग यांच्यात खरी स्पर्धा हाेती. मात्र अनुभवाच्या जाेरावर शास्त्रींनी बाजी मारली.
 
तीन वैशिष्ट्ये
लवचिकता : रवी शास्त्री यांनी पहिल्या क्रमांकापासून दहाव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी केली अाहे. याचाच अर्थ काेणतेही स्थान मिळाले तरी ते स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. एखाद्या प्रशिक्षकाकडे अशी लवचिकता लागतेच.
सर्वांशी सलाेखा : सुनील गावसकर यांच्यासह कपिल देव या कर्णधारांची पसंती रवी शास्त्रींना असे. विद्यमान कर्णधार विराट काेहलीसाेबतही त्यांचे चांगले संबंध अाहेत. गेल्या काही वर्षांत साैरभ गांगुलीशी वाद हाेता. मात्र अाता ताेही निवळला अाहे.
बारकाव्यांवर नजर : निवृत्तीच्या २५ वर्षांनंतरही शास्त्री यांनी माॅडर्न क्रिकेटमधील सर्व बारकावे अात्मसात केले अाहेत. क्रिकेट समालाेचनामुळे ते कायम खेळाशी संपर्कात असतात. दिग्गजांच्या कल्पनेतील अनेक बारकावेही शास्त्रींनी टिपले अाहेत. तसेच फलंदाजी व गाेलंदाजीबाबत ते सक्षम.
 
सहा तासांच्या घडामाेडीनंतर विराटच्या पसंतीवर माेहाेर
२०१४-१५च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महेंद्रसिंह धोनी याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विराट काेहलीला टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले. तेव्हाही शास्त्रीच टीम इंडियाचे संचालक होते. तेव्हापासून शास्त्री-कोहली यांचे चांगले संबंध आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...