आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ravi Shastri Is Team India's Interim Coach For Bangladesh Tour

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेश दौऱ्यासाठी रवी शास्त्री हंगामी प्रशिक्षक, तीन स्वतंत्र कोचही नेमले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बारताचा माजी कर्णधार रवी शास्त्री बांगलादेश दौऱ्यासाठी रवी शास्त्री हा भारतीय संघाचा हंगमी प्रशिक्षक असणार आहे. बीसीसीआयचे सचिन अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या नावावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाले. ऑस्ट्रेलिया दौगा आणि विश्वचषक स्पर्धेदरम्यान शास्त्री टीम इंडियाचे कोचिंग डायरेक्टर होते. तसेच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठीही तीन कोच नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात संजय बांगर फलंदाजी, भारत अरुण गोलंदाजी आणि आर श्रीधर हे क्षेत्ररक्षणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

कायमस्वरुपी कोचबाबत निर्णय नाही
सोमवारी सचिन, सौरव आणि लक्ष्मण या तिघांना BCCI चे सल्लागार नियुक्त केल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच रवी शास्त्री यांच्या भूमिकेबाबत चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र टीम इंडियाचे कायमस्वरुपी प्रशिक्षक कोण असतील याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.

रवी शास्त्रींना यश मिळू शकते, कारण...
- विश्वचषक स्पर्धेदरम्यान रवी शास्त्री यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाला एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यानंतर रवी शास्त्री यांनी मुख्य बूमिका निभावत टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्याबरोबर स्वतंत्रपमे चर्चा करून त्यांच्यातील बलस्थाने आणि त्रुटींवर काम केले होते. भारतीय असल्याने ते प्रत्येकाला चांगल्या प्रकारे समजूनही घेतात.
- 80 कसोटी आणि 150 वन डे सामन्यांचा अनुभव असल्याने सर्व प्रकारच्या परिस्थिती समजून घेण्याची क्षमता.

रवी शास्त्री यांचे इंटरनॅशनल करिअर
कसोटी
सामने - 80
धावा - 3830
शतक - 11
अर्धशतक - 12
विकेट - 151
वन डे
सामने - 150
धावा - 3108
शतक - 4
अर्धशतक - 18
विकेट - 129