मुंबई- रवी शास्त्री यांनी शुक्रवारी आयसीसी क्रिकेट कमिटीचा राजीनामा दिला. या कमिटीचे चेअरमन अनिल कुंबळे आहेत. शास्त्रीच्या या निर्णयाकडे प्रशिक्षकपदाच्या वादाशी जोडले जात आहे. याबाबत बोलले जात आहे की, कुंबळेंची टीम इंडियाच्या कोच म्हणून निवड झाल्यानंतर आयसीसीच्या या कमिटीवर सौरव गांगुलीला चेअरमन बनवले जाऊ शकते. काय आहे संपूर्ण प्रकरण...
- रवी शास्त्री गेल्या 6 वर्षापासून या कमिटीत मीडिया प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.
- शास्त्री म्हणाले, मी या कमिटीचा सदस्य म्हणून गेली अनेक महिने काम पाहिले आहे. मला आता वाटतेय की मला प्रशासकीय जबाबदा-यांपासून आता थोडा ब्रेक घेतला पाहिजे.
- या कमिटीची बैठक लॉर्ड्सवर 2 आणि 3 जून रोजी झाली होती. त्याला शास्त्री यांनी दांडी मारली होती.
हे असू शकते कारण
- इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलच्या वार्षिक परिषदेत या कमिटीच्या चेअरमनबाबत बातचीत होऊ शकते.
- आता याचे चेअरमन अनिल कुंबळे आहेत. मात्र, भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागल्याने ते या जबाबदारीतून मुक्त होतील. त्यामुळे नव्या व्यक्तीची निवड होणे अपेक्षित आहे.
- या पोस्टसाठी आता गांगुलीचे नाव पुढे केले जात आहे. कदाचित त्यामुळेच त्याआधीच शास्त्रींनी तेथून बाहेर पडणे पसंत केले आहे.
- या कमिटीत शंशाक मनोहर आणि राहुल द्रविड यांचाही समावेश आहे.
- मात्र, कुंबळेंनी यापुढे या कमिटीचे चेअरमनपद संभाळण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.
काय आहे वाद?
- कोच सिलेक्शन कमिटीत सचिन, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि संजय जगदाळे होते.
- मुलाखतीदरम्यान लक्ष्मण आणि संजय ताज बंगाल हॉटेलमध्ये होते. सचिन स्काईपद्वारे लंडनमधून जोडला गेला होता. शास्त्री बॅंकॉकमध्ये होते व त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे मुलाखत दिली होती.
- जेव्हा शास्त्री इंटरव्यू देत होते तेव्हा सौरव तेथे नव्हता. ते बैठकरूममधून बाहेर गेला होता. त्यावेळी त्याने फोन पण उचलला नव्हता.
शास्त्री-गांगुलीचे एकमेंकावर शाब्दिक हल्ले-
- शास्त्री म्हणाले, माझ्या मुलाखतीच्या वेळेस सौरव गांगुली उपस्थित नव्हता. त्याची ही भूमिका अपमानजनक होती. पुढे त्याने अशी चूक करू नये.
- आधी याबाबत गांगुलीने मौन बाळगले. मात्र, शास्त्रींचे हल्ले वाढल्यानंतर आता दादानेही पलटवार केला होता.
- सौरव गांगुली म्हणाला होता की, रवी शास्त्रींना त्या मुलाखतीची पूर्ण माहिती नाही. माझ्यामुळे त्यांचे प्रशिक्षकपद हुकल्याचे त्यांना वाटत असेल तर ते मूर्खांच्या जगात वावरत आहेत.
- अनिल कुंबळेंची नियुक्ती समितीचा सामूहिक निर्णय होता. जर मी त्यांच्या मुलाखतीच्या वेळेस हजर नव्हतो, तर तेही कुठे उपस्थित होते. त्यांनी बँकॉकमध्ये सुटी साजरी करत असताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्हे, तर बैठकीत येऊन प्रेझेंटेशन द्यायला हवे होते, असा पलटवार गांगुलीने केला होता.
पुढे वाचा, नेमकी वस्तूस्थिती काय आहे....