आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींपुढे अनिल कुंबळेचे आव्हान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आता रवी शास्त्रींशिवाय माजी कर्णधार अनिल कुंबळेनेही उडी मारली आहे. यामुळे प्रशिक्षकपदाची शर्यत अजूनच रंगतदार होणार हे निश्चित.

संदीप पाटील, व्यंकटेश प्रसाद, लालचंद राजपूत, विक्रम राठोड, बलविंदरसिंग संधू, रॉबिन सिंग, प्रवीण आमरे, टाॅम मुडी (ऑस्ट्रेलिया), स्टुअर्ट लॉ (ऑस्ट्रेलिया), डॅनियल व्हिट्टोरी (न्यूझीलंड) हे दिग्गजसुद्धा प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यानंतर ही शर्यत आणखी कठीण झाली आहे. मुख्य प्रशिक्षकपदासाठी आता कुंबळे आणि रवी शास्त्री हे प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे.

शास्त्री यांची उजवी बाजू
बीसीसीआयला जसा कोच हवा आहे, त्या कसोटीवर शास्त्री मजबूत दावेदार ठरतात. नवे बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीसुद्धा वारंवार शास्त्रींची, त्यांच्या कामाची स्तुती केली आहे. रवी शास्त्री यांनी १८ महिने टीम इंडियाचे डायरेक्टर म्हणून पद सांभाळले आहे. शास्त्री यांच्या मार्गदर्शनातच टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप २०१५ आणि टी-२० वर्ल्डकप २०१६ मध्ये सेमीफायनलपर्यंत धडक दिली होती. शास्त्री यांच्या कार्यकाळात भारताचे प्रदर्शन चांगले ठरले. याच काळात टीम इंडिया कसोटीत नंबर वनही बनली. खेळाडूंसोबत त्यांचा कसलाच वादविवाद झाला नाही, ही जमेची बाजू आहे.

> कुंबळेचे फलंदाजीचे तंत्र मजबूत नाही. येथे तो कमी पडू शकतो. गांगुली, सचिन, लक्ष्मणचा मित्रही आहे.
> कुंबळेची प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्द निष्कलंक ठरली. स्वत:ला झोकून देणारा, जिवाची पर्वा करणारा लढवय्या म्हणून त्याची ओळख.
> संघ समर्पण, अनुभव, स्वभाव, जुळवून घेण्याची शैली, युवा खेळाडूंना प्रेरित करण्याची कला, क्रिकेटच्या तंत्रात कुंबळे सरस.