आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षकपदाच्या निर्णयाने रवी शास्त्री नाराज; म्हणाले, गांगुलीला माझा काय प्रॉब्लेम?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (कोच) निवड न झाल्याने रवी शास्त्री नाराज आहेत. शात्री यांनी आपला सर्व राग सल्लागार समितीचे सदस्य व मार्जी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर काढला आहे. 'सौरव गांगुलीला माझा काय प्रॉब्लेम आहे?, माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळीही तो उपस्थित नव्हता. त्याने माझा अपमान केला आहे. गांगुलीने त्याचे पद व कामाचा मान ठेवावा,' अशा शब्दात शास्त्री यांनी गांगुलींवर शरसंधान साधले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनिल कुंबळे यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. कुंबळे यांच्याआधी रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. कुंबळे यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्‍यात आली आहे.

'इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना शास्त्री म्हणाले की, प्रशिक्षक निवडीचे अधिकार बीसीसीआयकडे आहे. माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळी सचिन, लक्ष्मण आणि संजय जगदाळे उपस्थित होते. पण, गांगुली उपस्थित नव्हता. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो कॅबिनमध्ये आला. तो का उपस्थित नव्हता. हे मला माहीत नाही. पण, त्याला माझा काय प्रॉब्लेम आहे, हे त्यालाच विचारायला हवे, असे शास्त्री यांनी सांगितले.

सौरव गांगुलीबाबत आणखी काय म्हणाले रवी शास्त्री? वाचा पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...