मुंबई- रवी शास्त्री यांचा
टीम इंडियाचे डायरेक्टर पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. बीसीसीआयसोबत केलेला करार हा टी 20 वर्ल्डकपपर्यंतच होता. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण व सौरव गांगुली यांची क्रिकेट सल्लागार समिती अर्थात सीएसीने करार रिन्व्हू केल्यास शास्त्रींकडे पुन्हा संघाचे डायरेक्टर पद येऊ शकते.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याने टीम इंडियासाठी फुल टाइम कोचिंग करण्याची इच्छा जाहीर केली आहे.
टी 20 वर्ल्डकपपर्यंतच होता रवी शास्त्री यांचा करार...
- रवी शास्त्री यांचा करार संपुष्टात आल्याचे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
- टीम इंडियाला सेमीफाइनलमध्ये वेस्ट इंडीजकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह इंडियाला टूर्नामेंटमधून बाहेर व्हावे लागले. शास्त्री यांचा करार टी 20 पर्यंत होता.
काय म्हणाले ठाकूर?
- बीसीसीआय टीम इंडियासाठी एक फूलटाइम कोचच्या शोधात आहे. याबाबत सर्व निर्णय सीएसी घेणार आहे.
- रवी शास्त्री अनुभवी असून त्यांना ही संधी पुन्हा मिळेल काय? या प्रश्नावर उत्तर देताना अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, याबाबत सर्व निर्णय सीएसी घेणार आहे.
- याबाबत 3 एप्रिलला सीएसीची मीटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शास्त्री केव्हा बनले डायरेक्टर?
- 2014 मध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा 1-3 असा पराभव केल्यानंतर रवी शास्त्रींना डायरेक्टरपद देण्यात आले होते. यानंतर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमावली होती.
- शास्त्री यांच्या नेतृत्त्वात टीम इंडिया वर्ल्डकप 2015च्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात टी 20 मालिकेेत टीम इंडियाने क्लीन स्वीप केले होते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कसोटी मालिकेत इंडियाने 3-0 असा विजय मिळवला होता.
- बांगलादेशात वनडे मालिका मात्र टीम इंडियाने गमावली होती.
पुढील स्लाइडवर पाहा, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नने टीम इंडियासाठी फुल टाइम कोचिंग करण्याची दर्शवली इच्छा..