आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जडेजाने केली अफलातून फिल्डिंग, विराटने पुन्हा दिले असे एक्सप्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - कोलकाता येथे सुरु असलेल्या भारत-श्रीलंका कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने अफलातून फिल्डिंग केली. सामन्याच्या चौथ्या दिवशी जडेजाने सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करीत चौके थांबविले. पण श्रीलंकेचे फलंदाज बाद होता होता राहिले. यावर कर्णधार वराट कोहली आणि खुद्द जडेजाही निराश झाला. 

 

हेराथने मारला होता वेगवान शॉट...

- भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर श्रीलंकन फलंदाज रंगना हेराथने पुल शॉट मारला होता. हा चेंडू वेगाने सीमारेषेकडे झेपावला. श्रीलंकेला चार धावा निश्चित होत्या. पण जडेजाने मध्येच येऊन हा चेंडू अडवला. 

- जडेजाने लाँग ऑनपासून पळत येऊन एकाच हाताने हा चेंडू थांबवला. तोल गेल्याने जडेजा चेंडू हातातच पकडून होता. जेव्हा वाटत होते की आता चौकार जाणार, तेव्हा जडेजाने चेंडू थ्रो केला.

- याच चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज आऊट होता होता राहिला. मात्र जडेजाच्या या थ्रोनंतर विराट कोहलीने निराशाजनक एक्सप्रेशन दिले. दुसरीकडे जडेजाच्या प्रयत्नांचे कौतुकही केले.

 

पुढील स्लाईडवर पाहा - या क्षणाचे छायाचित्र...

बातम्या आणखी आहेत...