नवी दिल्ली - माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड मंडळाच्या योजनांचा एक भाग आहे. द्रविडच्या योगदानाशिवाय देशातील क्रिकेटमध्ये सुधारणा आणणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी दिली. द्रविड लवकरच बीसीसीआयच्या योजनांमध्ये सक्रिय होईल. सचिन तेंडुलकरचा समावेश असलेल्या सल्लागार समितीमुळे क्रिकेटला नवी दिशा मिळेल. नक्कीच त्याच्या सल्ल्यांचे पालन केले जाईल, असेही दालमिया म्हणाले. शास्त्रीची संघ प्रशिक्षक म्हणून केलेली नियुक्ती काही काळाकरिता आहे की मोठ्या कालावधीसाठी, याचे उत्तर देणे मात्र दालमिया यांनी टाळले.
सचिन, सौरव, लक्ष्मणची नियुक्ती योग्य : गावसकर
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मणची बीसीसीआयच्या सल्लागर समितीमध्ये सदस्य म्हणून केलेल्या निवडीचे लिटिल मास्टर सुनील गावसकरने स्वागत केले.