आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई सुपर किंग्समध्ये दिसणार नाही हा भारतीय क्रिकेटर, हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - दोन वर्षाच्या बॅननंतर पुन:पदार्पण करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने येत्या हंगामात सलग आठव्या वर्षी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि ऑफ स्पिनर असलेल्या आर अश्विनला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र टीमने आऊट ऑफ परफॉर्मन्स असलेल्या सुरेश रैनाला टीमबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
आठ वर्षापासून चेन्नई सुपर किंग्ससोबत...
- आयपीएल प्रशासनाची लवकरच टीमच्या मालकांसोबत बैठक होणार आहे. त्यामध्ये रिटेन्शन पॉलिसीची घोषणा केली जाणार आहे.
- अशी अपेक्षा आहे की, ऑक्शनपूर्वी प्रत्येक टीम यापुढे तीन खेळाडूंना रिटेन करू शकणार आहे. यामध्ये दोन भारतीय, एक परदेशी खेळाडूचा समावेश असेल.
- स्थानिक माध्यमांनी सांगितल्यानुसार, चेन्नई सुपर किंग्सने धोनी आणि अश्विनला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र खराब परफॉर्मन्सच्या कारणास्तव रैनाला संघातून वगळण्याची दाट शक्यता आहे.
- चेन्नई टीमला स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळे दोन वर्षे आयपीएलपासून दूर ठेवण्यात आले होते. मागील दोन सामन्यात धोनी रायजिंग टीमकडून, तर रैना गुजरात लायन्सकडून खेळले आहेत.
- टी 20 च्या सक्सेसफुल प्लेअरपैकी सुरेश रैना सलग आठ वर्षे चेन्नई संघाकडून खेळले. रैनाने आतापर्यंत प्रत्येक सीझनमध्ये 400 पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...