आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे रँकिंग : क्रमवारीत रोहित पाचव्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे तिघे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. रोहितच्या कारकीर्दीतील ही सर्वोत्तम रॅकिंग आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत ४४१ धावा ठोकून शानदार प्रदर्शन केल्याचे फळ रोहितला क्रमवारीच्या रूपाने मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत रोहित मालिकावीर ठरला होता. या मालिकेत त्याने दोन शतकांसह पाचव्या वनडेत ९९ धावा काढल्या होत्या. क्रमवारीत भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम मानांकन रोहितला मिळाले आहे. त्याच्यापुढे विराट कोहली आहे. कोहली फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. वनडे मालिकेतील सुमार प्रदर्शनाचा फटका कर्णधार धोनीला बसला. सात स्थानांच्या घसरणीसह धोनी आता १३ व्या क्रमांकावर घसरला आहे. फलंदाजांच्या यादीत आफ्रिकेचा ए.बी.डिव्हिलर्स नंबर वन असून कोहली दुसऱ्या स्थानावर अाहे.