आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडुलकरचा जबरा FAN, \'सचिन: अ बिलियन ड्रीम्स\'मध्ये दिसला सुधीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- क्रिकेटच्या क्रिझवर दिसणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता बिग स्क्रीनवर दिसणार आहे. सचिनच्या आयुष्यावरील सिनेमा 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' मध्ये तो स्वत:च्या भूमिकेत फटकेबाजी करताना दिसणार आहे.

सचिनच्या सिनेमाचे टीजर नुकतेच रिलिज झाले. त्यात सचिनचा मुझफ्फरपुर (बिहार) येथील जबरा फॅन सुधीर गौतम ‍हा दिसला. हातात तिरंगा घेऊन 'सचिन-सचिन' ओरडताना दिसला. सचिनची प्रत्येक लढतीला सुधीर स्टेडियममध्ये पोहोचत असे. सचिनने रिटायरमेंट घेतल्यानंतर सुधीर आता 'टीम इंडिया'ला चिअर करताना दिसतो.

सुधीर असा बनला सचिनचा FAN...
- टीम इंडियाच्या प्रत्येक लढतीदरम्यान, तुम्ही एका व्यक्तीला पाहिले असेल. त्याने संपूर्ण शरीरावर तिरंग्याचा पेंट केला असेल. त्याचा हातात शंख असेल. तोच सुधीर. सचिनचा तो जबरा अर्थात मोठा चाहता आहे.
- सुधीर लढतीदरम्यान शंखनाद करून टीम इंडियाचे मनोबल वाढवतो.
- सचिनला भेटण्यासाठी सुधीर 8 ऑक्टोबर 2003ला पहिल्यांदा बिहारहून सायकलीने मुंबईकडे निघाला होता.
- 27 ऑक्टोबर 2003 रोजी तो मुंबईत पोहोचला. एका हॉटेलमध्ये तो सचिनला भेटला.
- 29 ऑक्टोबरला सचिनने सुधीरला आपल्या घरी बोलावले.
- कटकमध्ये होणार्‍या लढतीचा पास देखील सचिनने सुधीरला दिला.
- एका इंटरव्ह्यूमध्ये सुधीरने सांगितले की, सचिन टीम इंडियात होता तेव्हा तो छातीवर तेंडुलकर लिहायचा. आता 'मिस यू तेंडुलकर' असे लिहितो.

पुढील स्लाइड्स वाचा, या बिहारीबाबूने क्रिकेटच्या वेडामुळे सोडल्या किती तरी नोकर्‍या...
बातम्या आणखी आहेत...