आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटच्या देवाला सुद्धा पहिल्या सेंचुरीसाठी लागली 5 वर्षे, याच दिवशी ठोकले पहिले ODI शतक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या 79 व्या सामन्यात त्याने आयुष्यातील पहिले वनडे इंटरनॅशनल शतक लावले. - Divya Marathi
आपल्या 79 व्या सामन्यात त्याने आयुष्यातील पहिले वनडे इंटरनॅशनल शतक लावले.
स्पोर्ट्स डेस्क - क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आजपासून ठीक 23 वर्षांपूर्वी अर्थात 9 सप्टेंबर 1994 रोजी एकदिवसीय सामन्यातील आपले पहिले शतक ठोकले होते. त्याने वनडे इंटरनॅशनलमध्ये 1989 मध्ये डेब्यू केला तरीही त्याला पहिले शतक ठोकण्यासाठी 5 वर्षे लागली होती.
 

- पहिले शतक लावण्यासाठी त्याला 5 वर्षे आणि वनडे क्रिकेटचे 78 सामने खेळावे लागले. आपल्या 79 व्या सामन्यात त्याने आयुष्यातील पहिले वनडे इंटरनॅशनल शतक लावले. 
- श्रीलंकेत झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या मॅचमध्ये सचिनने 110 धावा काढल्या होत्या. 
- सचिन यानंतर वनडे इंटरनॅशनलमध्ये डबल सेंचुरी लावणारा तो पहिला क्रिकेटर सुद्धा बनला. त्याने एकूण 463 सामन्यांत तब्बल 18426 धावा काढल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या क्रिकेटरने काढलेल्या ह्या सर्वाधिक धावा आहेत. 
- या व्यतीरिक्त सचिनने 96 हाफ सेंचुरी सुद्धा लावल्या आहेत. त्याने आपला शेवटचा वनडे सामना 2012 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या विरोधातच 1989 मध्ये सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे करिअरची सुरुवात केली होती. 
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक लावणारा तो एकमेव फलंदाज आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 51 शतक केले आहेत. तर, वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 49 शतकांचा विक्रम आहे.
 
 
विनोद कांबळी होता पार्टनर
या मॅचमध्ये तेंडुलकरने मनोज प्रभाकरसोत ओपनिंग केली होती. दोगांनी मिळून 87 धावा काढल्या, त्यापैकी 67 धावा सचिनच्या होत्या. मनोज प्रभाकर बाद झाल्यानंतर सचिनची साथ विनोद कांबळीने दिली. आपल्या लहानपणीच्या मित्रासोबत सचिनने पहिल्या शतकाचे स्वप्न साकारले. 130 चेंडूंमध्ये 110 धावा करणाऱ्या सचिनने 8 चौकार आणि 2 षटकार लावले होते. सचिनची साथ देताना विनोद कांबळीने 47 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. कांबळी धावबाद झाला. तर सचिनला क्रेग मॅक्डरमॉटने बोल्ड केले ही मॅच भारताने 31 धावांनी जिंकली होती. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, टेस्ट करिअरचे पहिले शतक आणि फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...