आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवर सारा, अर्जुन नावाचे अकाउंट FAKE, असा भडकला सचिन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आपल्या मुलांविषयी किती प्रोटेक्टिव्ह असतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आपल्या मुला-मुलीच्या नावे ट्विटरवर बनावट अकाउंट काढणाऱ्यांवर त्याने संताप व्यक्त केला. मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे ट्विटरवर एकही अकाउंट अस्तित्वात नाही. या दोघांच्या नावे चालवले जाणारे ट्विटर अकाउंट बनावट आहेत. एवढेच नव्हे, तर ट्विटरने ते FAKE अकाउंट डिलीट करावे असे आवाहन देखील मास्टर ब्लास्टर सचिनने केले. 
 
>> सचिनने पहिल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले की त्याचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे ट्विटरवर अकाउंट नाहीत. हे दोघेही ट्विटरपासून दूर आहेत. 
>> दुसऱ्या ट्विटमध्ये सचिन म्हणाला, 'वेश बदलून अशा प्रकारचे खोटे अकाउंट बनवणे एक प्रकारची दहशत निर्माण करतात. गैरसमज निर्माण होतात आणि आपल्या सगळ्यांनाच समस्या येतात.'
>> 'मी अशा प्रकारच्या सर्वच प्लॅटफॉर्म्सला (सोशल मीडिया) आवाहन करतो, की त्यांनी वेळीच या समस्येवर योग्य पाऊल उचलावे.' सचिनने यापूर्वी 2014 मध्ये सुद्धा ट्वीट करून आपली मुलं ट्विटरवर नाहीत असे स्पष्ट केले होते. 
>> उल्लेखनीय बाब म्हणजे, सचिनच्या मुलीच्या नावे असलेल्या अकाउंटवर शरद पवारांसंदर्भात एक ट्वीट करण्यात आले होते. त्यावरून जीतेंद्र आव्हाडांनी चौकशीची मागणी केली होती. त्याच कारणावरून सचिन FAKE अकाउंटवर संतप्त झाला असे सांगितले जात आहे.
>> सचिनच्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेत ट्विटरने त्याच्या मुला मुलींच्या नावे असलेले बनावट अकाउंट बंद केले आहेत. 
 
 
पुढील स्लाइड्सवर सचिनने केलेले ट्वीट...
बातम्या आणखी आहेत...