आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sachin Sourav And Laxman Will Be Advisor Of BCCI

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिन, सौरव, लक्ष्मण BCCI चे सल्लागार, निवड समिती ठरवण्याचे अधिकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियाच्या संघातील तीन माजी दिग्गज क्रिकेटपटुंचा बीसीसीआयच्या सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. बीसीसीआयसी संलग्न झाल्याबाबत त्यांनी या तीन दिग्गजांचे आभार मानले. अनुराग आज या तिघांची भेटही घेणार आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी काही दिवसांपूर्वी सौरव गांगुली लवकरच सल्लागार बनतील असे सांगितले होेते. त्याआधी सौरव टीम इंडियाचा कोच बनणार अशा शक्यताही व्यक्त करण्यात येत होत्या.

तिघांची भूमिका काय?
बीसीसीआयचे सल्लागार बनल्यानंतर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि लक्ष्मण आता क्रिकेटशी संबंधित मुद्यांवर बीसीसीआयला सल्ला देतील. विशेष म्हणजे संघाची निवड करणाऱ्या निवड समितीचे सदस्य कोण असतील हेही ही सल्लागार समितीच ठरवत असते.

दिग्गजांचा सहभाग असावा अशी दालमियांची इच्छा
सचिन, गांगुली आणि लक्ष्मण हे तिघेही दीर्घकाळ देशासाठी क्रिकेट खेळले आहेत. यासंबंधी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी आधीही क्रिकेटशी संबंधित मुद्दे दिग्गज खेळाडुंच्या हाती असावे, असी इच्छा व्यक्त केली होती.

दोन महिन्यांपासून प्रशिक्षकाचा शोध
वर्ल्ड कपनंतर प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ समाप्त झाला होता. तेव्हापासूनच टीम इंडियासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू आहे. 10 जूनपासून टीम इंडियाचा बांगलादेश दौरा सुरू होत आहे.

द्रविडचा समावेश का नाही ?
26 एप्रिलला बोर्डाच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत सौरभ, सचिनसह द्रविडच्या नावावरही एकमत झाले होते. पण आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे बीसीसीआयच्या या प्रस्तावावर नंतर विचार करणार असल्याचे त्यांनी नंतर के नाम पर भी सहमति बनी थी। तब द्रविड़ ने कहा था कि आईपीएल उनके काफी व्यस्तता भरा रहा है। लिहाजा, वे बीसीसीआई के प्रस्ताव के बारे में आईपीएल के बाद ही विचार करेंगे। माना जा रहा है कि द्रविड़ ने प्रस्ताव स्वीकार नहीं किया। इसी वजह से वीवीएस लक्ष्मण के नाम पर सहमति बनी। द्रविड़ राजस्थान रॉयल्स के टीम मेंटर हैं।

बोर्डाच्या मते अशी असावी सल्लागारांची भूमिका ?
माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार बीसीसीआयच्या नव्या प्लाननुसार तील सल्लागारांना खालील जबाबदारी सोपवल्या जाऊ शकतात. जिम्मदारियां भी सौंपी जा सकती हैं-
1. हाय परफॉर्मंस मॅनेजमेंट : तिन्ही दिग्गजांना टीम इंडियाच्या परफॉर्मंसवर फोकस करायला सांगितले जाऊ शकते. टीमचा प्रत्येक खेळाडू प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करेल यासाठी ते प्रयत्न करतील.

या भूमिकेत कोण फिट - गांगुली यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. त्याच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने 2000 पासून 2005 दरम्यान 49 कसोटी खेळल्या त्यापैकी 21 मध्ये विजय आणि 13 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 14 कसोटी अनिर्णित राहिल्या होत्या. गांगुलीने वनडेमध्ये 147 सामन्यांचे नेतृत्व केले होते. त्यापैकी त्याने 76 मध्ये विजय मिळवून दिला. तर 66 सामन्यांत पराभव झाला होता.
2. टॅलेंट सिलेक्शन : राज्यांसाठी खेळणाऱ्या खेळाडुंपैकी आगामी काळात कोणते खेळाडू टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, यावर नजर ठेवली जाईल.
या भूमिकेत कोण फिट : व्हीव्हीएस लक्ष्मणला ही जबाबदारी मिळू शकते. तो तंत्रशुद्ध फलंदाज आहे. त्याने टेस्ट क्रिकेट टीमला मजबूत डिफेंस दिला होता. दीर्घकाळ फलंदाजी करू शकणारे टॅलेंट शोधण्यासाठी त्याला जबाबदारी मिळू शकते. लक्ष्मणने 134 कसोटींमध्ये 46 च्या सरासरीने 8781 धावा केल्या आहेत.
3. नॅशनल क्रिकेट अकादमी : ही अकादमी नव्या दमाच्या क्रिकेटपटुंसाठी वेळोवेळी शिबिरांचे आयोजन करत असते.
या भूमिकेत कोण फिट : सचिन तेंडुलकरला ही जबाबदारी मिळू शकते. विशेषतः तो फलंदाजांना सर्वप्रकारच्या खेळपट्ट्यांवर धावा कशा जमवायच्या याचे मार्गदर्शन करू शकतो. सचिनने 200 कसोटी सामन्यांत 15921 तर 463 वनडे सामन्यांत 18426 दावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एकूण 100 शतकांचा समावेश आहे.