आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Information About Sachin Tendulkar And Anjali Love Story

RARE PHOTOS : असे झाले होते सचिन - अंजलीचे लग्‍न, वाचा, LOVE STORY

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतासह संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर तब्बल 24 वर्षे अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 43 वा वाढदिवस. सचिनने आपल्या फलंदाजीने क्रिकेट रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. वाढदिवसानिमित्त आम्ही सचिन तेंडुलकरच्या 'लव्ह लाईफ'विषयी एक किस्सा आपल्यासाठी घेवून आलो आहोत. शिवाय या विशेष पॅकेजमधून सचिनच्‍या लग्‍नाचे दुर्मिळ फोटोजही आम्‍ही तुम्‍हाला दाखवणार आहोत.
अंजली भेटली होती पत्रकार म्‍हणून
पहिल्याच नजरेत अंजली सचिनवर भाळली होती. सचिनला भेटण्‍यासाठी अंजली पत्रकार म्‍हणून त्याच्या घरी गेली होती. तेव्‍हा सचिनच्‍या आईने तिला ‘तू खरोखर पत्रकार आहेस का? असा प्रश्‍न केला होता. तेव्‍हा अंजलीची भंबेरीही उडाली होती. याशिवाय अंजलीने सचिनला 'चॉकलेट' गिफ्ट केल्यानंतर आईच्या सर्व प्रकार लक्षात आला होता. पण तिने फक्त स्मित हास्य करून अंजलीला सून म्हणून स्वीकारले होते, असा खुलासा एकदा खुद्द सचिनने केला होता.

सचिन तेंडुलकरने ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रातून क्रिकेट आणि आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टींना उजाळा दिला आहे. त्यात त्याने आपल्या लव्ह लाईफचे वर्णन केले आहे. क्रिकेटचा महानायक, मास्‍टर ब्‍लॉस्‍टर सचिन तेंडुलकरलाही पहिल्‍याच नजरेत प्रेम जडले होते. भलेही अंजली सचिनपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, अंजली आणि सचिनची लव्ह लाइफ... आणि पाहा दुर्मिळ फोटोज....