आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar, Gagan Narang, Sania Mirza On National Anthem Song

मैदानावर राष्ट्रगीत गाताना छाती गर्वाने फुलते : सचिन तेंडूलकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत म्हणताना तुमची मान ताठ हाेते. मात्र, जेव्हा तुम्ही मैदानावर असता, त्या वेळी तुमची छाती गर्वाने फुलते,’अशा शब्दात भारतीय संघाचा क्रिकेटपटू अाणि खासदार सचिन तेंडुलकरने राष्ट्रगीताचा गाैरव वर्णन केला.

युवकांना खेळाविषयी रुची निर्माण व्हावी, यासाठी रविवारी अायाेजित करण्यात अालेल्या कार्यक्रमात ‘स्पाेर्टस हीराे व्हिडिअो अल्बम’चे अनावरण करण्यात अाले. याप्रसंगी सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज खेळाडूदेखील उपस्थित हाेते. ‘पाकिस्तानविरुद्ध सामन्यादरम्यान मैदान अाणि स्टेडियमवरील वातावरण हे वेगळेच असते. २००३ मधील वर्ल्डकपमध्ये (सेंच्युरियनमध्ये) पाकिस्ताविरुद्ध सामन्यादरम्यान मैदानावर स्टेडियममध्ये बसलेल्या ६० हजार चाहत्यांसाेबत ‘जन गण मन’ म्हणण्याचा अनुभव वेगळाच हाेता. अाजही पाकविरुद्ध व २०११ च्या विश्वचषक फायनलमधील क्षण अाठवतात. ताे राष्ट्रगानाचा अावाज अाजही घुमताे अाहे,’असे ताे म्हणाला.
सचिन, सानिया, भुतियासारखे खेळाडू अल्बममध्ये
या व्हिडिअाेमध्ये सचिनसह देशातील अव्वल अाठ खेळाडूंनी ‘जन गण मन’ हे राष्ट्रगान गायिले अाहे. तसेच या सर्वांनी राष्ट्रगीत गाताना मनात निर्माण हाेणारी राष्ट्रभक्ती अापल्या शब्दात कथन केली. सचिनसाेबत सानिया मिर्झा, सुशील कुमार, सुनील गावसकर, भुतिया, गगन नारंग, धनराज पिल्ले अाणि महेश भूपतीसारख्या खेळाडूंचा यात समावेश अाहे.
> पदक जिंकल्यानंतर प्रत्येक वेळी राष्ट्रगान एेकण्याचा अनुभव वेगळाच असताे. वैयक्तिक अाम्ही मैदानावर खेळत असलाे, तरी प्रत्यक्षात देशाचे प्रतिनिधित्व करत असताे. हीच अामच्यासाठी अभिमानाची गोष्ट अाहे.
सानिया मिर्झा, टेनिसपटू, भारत.
> अाॅलिम्पिक, राष्ट्रकुल व माेठ्या स्पर्धांमध्ये राष्ट्रगीत सातत्याने गायिले जावे, अशी जबाबदारी अाम्हा प्रत्येक खेळाडूंवर असते. या वेळी गायिल्या जाणाऱ्या राष्ट्रगानाचा अनुभव शब्दात सांगता येणार नाही.
सुशील कुमार, कुस्तीपटू
गत १९९८ च्या अाशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना अामच्या प्रत्येकामध्ये अानंदाचे वातावरण निर्माण झालेले हाेते. जगातील सर्वात माेठा अानंद मिळवल्याचा हा अनुभव हाेता.
> धनराज पिल्ले, माजी हाॅकीपटू.