आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झंझावात: महाराष्ट्राची ओरिसावर 4 विकेटने मात, अंकित चमकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटक- सै. मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत औरंगाबादचा युवा तडफदार फलंदाज अंकित बावणेच्या नाबाद ४९ धावांच्या खेळीच्या बळावर महाराष्ट्राने ओरिसाला ४ विकेटने हरवले. अखेरच्या चेंडूवर विजयी धाव काढून महाराष्ट्राने बाजी मारली.

ओरिसाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने ६ बाद १८४ धावा काढून बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली नाही. हर्षद खडीवाले केवळ ७ धावा काढून बाद झाला. यानंतर चिराग खुराणा आणि केदार जाधव यांनी ४१ धावांची भागीदारी केली. चिरागने २२ चेंडूंत ३७, तर केदारने १० चेंडूंत २० धावा काढल्या. निखिल नाईक १५ धावांचेच योगदान देऊ शकला.

संकलेचाने १ धाव काढली. महाराष्ट्राची टीम ११.२ षटकांत ५ बाद ८४ अशी संकटात सापडली होती. यानंतर अंकित बावणे आणि भाटी यांनी विजय खेचून आणला. विजयासाठी ३ धावांची गरज असताना भाटी बाद झाला. भाटीने ३३ चेंडूंत ३ षटकार, ३ चौकार मारले, तर अंकित बावणेने २४ चेंडूंत ४ षटकार आणि ३ चौकार मारून नाबाद ४९ धावा चोपल्या. श्रीकांत मुंढेने नाबाद ३ धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी ओरिसाने बी. संमथ्रेच्या १०२ धावा आणि पोद्दारच्या ६३ धावांच्या बळावर ४ बाद १८३ धावांचा डोंगर उभा केला होता. महाराष्ट्राकडून अनुपम संकलेचाने २३ धावांत २ गडी बाद केले.

अंकित बावणे
४९*धावा
२४चेंडू
०४षटकार
०३चौकार
२०४.१६
स्ट्राइक रेट