आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनंतर सायना नेहवाल नागपुरात खेळणार; 2 नाेव्हेंबरपासून राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा रंगणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेची- रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील राैप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू अाणि माजी नंबर वन सायना नेहवालसह अव्वल दर्जाचे अांतरराष्ट्रीय खेळाडू अाता यंदाच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत खेळतील. ही स्पर्धा २ नाेव्हेंबरपासून नागपुरात सुरू हाेणार अाहे, अशी माहिती अखिल भारतीय बॅडमिंटन महासंघाचे (बाई) अध्यक्ष हिमंता बिस्वा यांनी दिली. सायना अाणि सिंधूही नागपूरच्या मैदानावर खेळणार अाहेत. महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंना या दाेन्ही अव्वल बॅडमिंटनपटूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी अाहे. ही संधी अाता नाेव्हेंबरमध्ये चालून अाली अाहे. ही स्पर्धा २ ते ८ नाेव्हेंबरदरम्यान अायाेजित करण्यात अाली आहे. 

यंदापासून अांतरराष्ट्रीय खेळाडूंना सहभाग सक्तीचा 
यंदापासून महासंघाने अापल्या अांतरराष्ट्रीय खेळाडूंना राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील सहभाग सक्तीचा केला अाहे. त्यामुळे या वर्षी नाेव्हेंबरमधील राष्ट्रीय स्पर्धेत भारतातील अव्वल बॅडमिंटनपटू सहभागी हाेतील. त्यामुळेे प्रणयसह अजय जयराम, के. श्रीकांत अाणि बी.साईप्रणीतलाही सक्तीने या स्पर्धेत सहभागी व्हावे लागणार अाहे.

७ वर्षांनंतर राष्ट्रीय स्पर्धेत
माजी नंबर वन सायना नेहवाल  अाता तब्बल सात वर्षांनंतर राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना दिसणार अाहे. तिने अापल्या करिअरमध्ये २०१० मध्ये शेवटची राष्ट्रीय स्पर्धा खेळली हाेती. त्यानंतर तिने राष्ट्रीय स्पर्धेतील अापला सहभाग टाळला.

७ नाेव्हेंबरपासून मकाऊ अाेपन
भारतातील राष्ट्रीय स्पर्धेदरम्यानच एका अांतरराष्ट्रीय स्पर्धेला सुुरुवात हाेईल. मकाऊ अाेपन ७ नाेव्हेंबरपासून रंगणार अाहे. ही स्पर्धा ७ ते १० नाेव्हेंबरदरम्यान मकाऊ येथे अायाेजित करण्यात अाली. सिंधूने २०१३ अाणि २०१५ मध्ये या स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला अाहे.
बातम्या आणखी आहेत...