आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया, बोपन्नाची आगेकूच; महिला गटात सेरेना, अँडी मरेची अंतिम १६ मध्ये धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- भारताची अव्वल महिला टेनिसपटू आणि जगातली नंबर वन दुहेरीची खेळाडू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी आपापले सामने जिंकत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत आगेकूच केली आहे. मात्र, भारताचा अनुभवी खेळाडू लियांडर पेस आणि त्याची जोडीदार मार्टिना हिंगीस जोडीचा पराभव झाला. या पराभवासह पेसचे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तो पुरुष दुहेरीत याआधीच बाहेर झाला होता. महिला एकेरीत नंबर वन सेरेना विल्यम्स आणि पुरुषांत इंग्लंडच्या अँडी मरेने अंतिम १६ मध्ये प्रवेश केला.
सानिया मिर्झा आणि तिची चेक गणराज्यची जोडीदार बार्बरा स्ट्रायकोवा यांनी व्हिक्टोरिजा गोलुबिक आणि निकोल मिलचेर यांनी ६-२, ७-६ (५) ने हरवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता सानिया आणि बार्बरा यांचा पुढचा सामना बिगर मानांकित जोडी निकोल गिब्ज आणि हिबिनो यांच्याशी होईल. मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना कॅनडाची गॅब्रियला डाब्रोवस्कीचा लुकास कुबोत आंद्रे हेल्वाकोवाने ५-७, ६-३, १०-७ ने पराभव झाला. गतचॅम्पियन लियांडर पेस आणि मार्टिना हिंगीस जोडी दमदार प्रदर्शन करेल, अशी आशा होती. मात्र, सातव्या मानांकित कोको वेंदेव्हेगे राजीव राम यांच्याकडून त्यांचा ७-६, ३-६, १३-११ ने पराभव झाला.

सेरेनाचा विक्रमी विजय
नंबरवन टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने स्वीडनच्या जोहाना लॉरसनला ६-२, ६-१ ने हरवले. या विजयासह सेरेनाने अंतिम १६ मध्ये आपले स्थान पक्के केले. हा विजय सेरेनासाठी ऐतिहासिक ठरला. सेरेनाने या विजयासह सर्वाधिक ३०७ ग्रँडस्लॅम सामने जिंकत मार्टिना नवरातिलोवाला मागे टाकले. सेरेनाने फक्त नवरातिलोवाला मागे टाकले नाही, तर ितने पुरुष गटातील खेळाडू फेडररच्या विक्रमी विजयाची बरोबरी केली. पुरुष महिला अशा दोन्हींत ३०७ विजयांसह आघाडी घेणे ही आनंददायक बाब आहे. मी या विजयामुळे खूप आनंदी आणि उत्साहित झाली आहे, अशी प्रतिक्रिया सेरेनाने व्यक्त केली.

वावरिंकाचा राेमहर्षक विजय: स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने इंग्लंडच्या डेन इव्हान्सला पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात ४-६, ६-३, ६-७, ७-६, ६-२ ने हरवत चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला. त्याचा हा राेमहर्षक विजय ठरला. दिमित्रोने पोर्तुगालच्या जोआओ सौसाला ६-४, ६-१, ३-६, ६-२ अशा फरकाने मात दिली.

मरेची लाेरेंजीवर मात
इंग्लंडच्या अँडी मरेने इटलीच्या पाओलो लोरंेंजीवर मात करून अंतिम-१६ मध्ये प्रवेश केला. यासाठी मरेला चांगलाच घाम गाळावा लागला. तीन तास १६ मिनिटे रंगलेल्या लढतीत मरेने ७-६, ५-६, ६-२, ६-३ ने विजय मिळवला. दुसरा मानांकित मरेने पहिल्या दोन सेटमध्ये ४७ चुका करताना १२ पैकी केवळ ब्रेक पॉइंट मिळवले. मात्र, नंतर त्याने लय मिळवत बाजी मारली.

महिलांतील इतर सामने
महिला गटात इतर सामन्यांत पाचवी मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने ३१ वी मानांकित हंगेरीच्या टिमिया बाबोसला ६-१, २-६, ६-४ ने मात देत चौथ्या फेरीत प्रवेश केला. हालेपचा सामना आता ११ वी मानांकित स्पेनच्या कार्ला सुआरेजशी होईल. सुआरेजने रशियाच्या एलिना वेस्निनाला ६-४, ६-३ ने हरवले.
बातम्या आणखी आहेत...