आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा झाला ४३ वर्षांचा, शुभेच्छांसाठी चाहत्यांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली बुधवारी ४३ वर्षांचा झाला. त्याला बीसीसीआय, बंगाल क्रिकेट संघटना, सहकारी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. सचिन तेंडुलकरने फेसबुकवर दोघांचा एक जुना फोटो शेयर करत लिहिले की, हॅप्पी बर्थडे दादा, तुम्ही नेहमी असेच तरुण राहा. या फाेटोत दोघे क्रिकेटपटू तरुण आहेत आणि गांगुली सचिन सोबत पाठीमागे उभा राहिलेला दिसतोय. गांगुली आणि सचिनने दीर्घकाळ सोबत क्रिकेट खेळले आहेत. दोघांनी सोबत हजारो धावा काढल्या असून अनेक विक्रम तोडले व बनवलेही.