नवी दिल्ली- श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड गुरुवारी होईल. भारतीय संघ लंकेच्या दौऱ्यावर तीन कसोटी खेळणार आहे. पहिल्या कसोटीला १२ ऑगस्टपासून सुरुवात होईल. वृद्धिमान साहा यष्टिरक्षकासाठी निवड समितीची पहिली पसंत असेल. दुसरा यष्टिरक्षक म्हणून १६ व्या खेळाडूच्या रूपात नमन ओझा किंवा संजू सॅमसनला संधी मिळू शकते. संघात तीन वेगवान गोलंदाज उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार असतील. वेगवान गोलंदाज वरुण अॅरोन फिट असेल तर त्याचीही निवड होऊ शकते. दोन फिरकीपटू म्हणून आर. अश्विन आणि हरभजनसिंगची निवड शक्य आहे.