आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos : या फलंदाजाच्या वागण्यामुळे भडकला विराट कोहली, हे आहे प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत-श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी नाट्यमय घटना बघायला मिळाल्या. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले होते. सामन्यात 19वे षटक सुरु असतांना भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी आणि कर्णधार विराट कोहली भडकले होते. प्रकरण शांत मकरण्यासाठी अंपायरला मध्यस्ती करावी लागली. 

 

अशी आहे संपूर्ण घटना

 

- 19व्या षटकात मोहम्मद शमीने पहिल्या चेंडू बाऊंसर फेकला. ज्यामुळे डिकवेला खेळू शकला नाही. पुढच्या चेंडू टाकत असतांना डिकवेलाने शमीला थांबविले. 

 

- डिकवेलाची ही रिअॅक्शन शमीला आवडली नव्हती. खरे पाहता डिकवेलाने डोके खाली करून हाताने शमीला परत जाण्याचा इशारा केला.

 

- फलंदाजाची ही प्रतिक्रिया पाहून भारतीय कर्णधार विराट कोहलीला राग आला. त्यानंतर शमीच्या बॉलवर डिकवेला आऊट होता होता बचावला.

 

- त्यानंतर शमी आणि डिकवेला दोघांची वादावादी झाली. विराट आणि अंपायर हे पाहत होते.

 

- पुढील बॉलवर डिकवेलाने पुन्हा शमीला थांबवून इशारा केला. त्यानंतर अंपायरने डिकवेला, श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांडीमल आणि विराट कोहलीने एकत्र येऊन चर्चा केली.

 

- या प्रकरणावर विराट कोहली इतका तापला की, अंपायरचेही ऐकण्यास तयार नव्हता. ते षटक संपल्यानंतर अश्विन आणि डिकवेलामध्ये वाद झाले.

 

पुढील स्लाईडवर पाहा - ही संपूर्ण घटना...

बातम्या आणखी आहेत...