आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी टेंटमध्ये झोपला, कधी कमावले 500 रुपये, असा क्रिकेटर बनला हा ग्रामीण मुलगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - मोहम्मद शमीने नुकताच (3 सप्टेंबर) आपला 28 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. यूपीच्या अमरोहा येथील एक छोटसे गाव सहसपूर येथे राहणारा शमी लहानपणापासूनच क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहत होता. त्याचे वडील सुद्धा आपल्या काळातील फास्ट बोलर म्हणून ओळखले जात होते. त्यांनीच आपले स्वप्न आपला मुलगा शमीच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. वडिलांनीच शमीला क्रिकेट शिकण्यासाठी कोलकाता येथे पाठवले होते. 
 
 
टॅलेंट ओळखणारे वडीलच पहिले
- शमीचे वडील तौसिफ अली सुद्धा आपल्या जमान्यात एक फास्ट बोलर होते. मात्र, संधी न मिळाल्याने ते आपले स्वप्न साकारू शकले नाहीत. त्यांनी ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट्स विक्रीचे दुकान उघडले होते. 
- त्यांना तीन मुले आहेत. ते तिघेही वडिलांप्रमाणेच क्रिकेटचे शोकीन आहेत. तिघांनाही फास्ट बोलिंगचा नाद आहे. यापैकी सर्वात मोठ्या मुलाला किडनी स्टोन झाल्यानंतर त्याने फॅमिली बिझनेस सांभाळण्याचा निर्णय घेतला. 
- तर शमी लहानपणापासूनच क्रिकेटचा वेडा होता. त्याला लहानपणी संधी मिळेल तेथे तो गोलंदाजी करायला सुरुवात करायचा. घराच्या अंगणात, छतावर किंवा बाहेरच्या रिकाम्या जागेवर तो आपला छंद जोपासत होता. 
- शमी सुरुवातीपासूनच फास्ट बोलर होता. अगदी लहान वयात सुद्धा त्याच्या बोलिंगचा वेग पाहून सगळेच थक्क होते असे. स्थानिक टोर्नामेंट्समध्ये तो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र होता. 
- तौसिफ अली यांनी तिन्ही मुलांपैकी मधला मुलगा शमी हाच सर्वात टॅलेंटेड असल्याचे ओळखले. त्याला मुरादाबाद येथे राहणारे कोच बदरुद्दीन सिद्दीकी यांच्याकडे घेऊन गेले. 
- बदरुद्दीन यांनी दिलेल्या कोचिंगचा शमीला फायदा झाला. मात्र, छोट्या शहरात राहून त्याला हव्या तशा संधी मिळाल्या नाहीत. वर्षभरानंतर त्याला वडिलांनी कोलकाता येथे पाठवले.
 

टेंटमध्ये काढल्या रात्री
- शमी 2005 मध्ये 16 वर्षांचा असताना तो क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहून कोलकाता शहरात पोहोचला होता. डलहौजी एथलेटिक्स क्लब मध्ये त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 
- कोलकाता पोहोचल्यानंतर सुरुवातीला शमीकडे राहण्याची काहीच सोय नव्हती. त्यामुळे, त्याला डलहौजी क्लबमध्ये लावलेल्या टेंटमध्ये झोपावे लागले होते. 
- काही दिवसांनंतर पैसा मिळाल्यानंतर तो इतर क्रिकेटर्सप्रमाणे, रुम घेऊन राहत होता. त्यावेळी डलहौजीसाठी एक मॅच खेळल्यास 500 रुपये मिळत होते. 
- यानंतर काही महिन्यांतच कोलकाताच्या एका नावाजलेल्या टाउन क्लबचा तो सदस्य झाला. या ठिकाणी त्याला 75000 रुपयांचा वार्षिक कंत्राट मिळाला. या व्यतीरिक्त 100 रुपये दररोज दिले जात होते. यानंतर शमीने कधीही मागे वळून पाहिले नाही. 
 

पुढील स्लाइड्सवर वाचा... शमीच्या आयुष्यातील आणखी काही फॅक्ट्स आणि फोटोज...
बातम्या आणखी आहेत...