आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shane Watson Dropped By Australia Ahead Of India ODI Series

ऑस्ट्रेलिया संघातून झाली शेन वॉटसनची हकालपट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- येत्या १२ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा झाली असून त्यांचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनची हकालपट्टी करण्यात आली आहे. भारताविरुद्ध मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाजांवर जोर देताना ऑफस्पिनर नॅथन लॉयनकडे दुर्लक्ष केले आहे. ऑस्ट्रेलिया संघात वेगवान गोलंदाज जोएल पॅरिस आणि स्कॉट बोलांड हे दोन नवे चेहरे आहेत. सोमवारी ऑस्ट्रेलियाने आपल्या १३ सदस्यीय संघाची घाेषणा केली.

पर्थ, मेलबर्न व सिडनीतील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल अाहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांवर जोर देण्यात आल्याचे निवड समितीने स्पष्ट केले. त्यासाठी नवोदित जोएल पॅरिस, स्कॉट बोलांड यांना निवडले.

वॉटसन संघाबाहेर : अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनला वनडे संघात संधी मिळू शकली नाही. त्याने अॅशेस पराभवानंतर कसोटीतून निवृत्ती घेतली होती. आता वनडे संघातूनही बाहेर करण्यात आल्याने त्याच्यासमोरील संकट वाढले आहे. वनडे व टी-२० वर लक्ष केंद्रित करण्यासाठी वॉटसनने सप्टेंबरमध्ये कसोटीतून निवृत्ती घेतली होती.

ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ
स्टिव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जॉर्ज बेली, स्कॉट बोलांड, जोश हेझलवूड, जेम्स फॉकनर, अॅरोन फिंच, मिचेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्स्वेल, केन रिचर्डसन, जोएल पॅरिस, मॅथ्यू वेड.
> पहिला वनडे १२ जानेवारी पर्थ
> दुसरा वनडे १५ जानेवारी ब्रिस्बेन
> तिसरा वनडे १७ जानेवारी मेलबर्न
> चौथा वनडे २० जानेवारी कॅनबेरा
> पाचवा वनडे २३ जानेवारी सिडनी
> पहिला टी-२० २६ जानेवारी अॅडिलेड
> दुसरा टी-२० २९ जानेवारी मेलबर्न
> तिसरा टी-२० ३१ जानेवारी सिडनी