आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोहर पद सोडणार हे सत्य की अफवा? खुर्चीच्या लालसेपायी रंगताहेत डावपेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या कार्यपद्धतीची पाळेमुळेच खणायला सुरुवात केल्यानंतरही खुर्चीच्या लालसेपायी आपापले डावपेच खेळण्यात ज्येष्ठ मंडळी मागे राहिली नाहीत. विद्यमान अध्यक्ष शशांक मनोहर यांनी स्वत: जाहीर करण्याआधीच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर डोळा असणाऱ्यांनी मनोहर अध्यक्षपद सोडणार असल्याची आवई उठवली. त्यांच्या जागी अजय शिर्के, शरद पवार यापासून अनेक नावांची चर्चा सुरू केली. प्रत्यक्षात ज्यांना या खुर्चीचा मोह आहे ते उमेदवार पडद्यामागूनच साऱ्या गोष्टी हाताळत आहेत.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष अजय शिर्के यांना यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी कानावर हात ठेवले. ते म्हणाले, ‘माझी इच्छा असली तरीही मला कोण अध्यक्ष करणार? अन्य रथी-महारथी त्या खुर्चीसाठी उत्सुक असताना माझी डाळ काही शिजणार नाही.’ जगमोहन दालमिया आजारपणामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाला अखेरच्या काळात न्याय देऊ शकत नव्हते. त्या वेळी सर्वेसर्वा हे सचिव अनुराग ठाकूर हेच होते. जी गोष्ट श्रीनिवासन यांच्याबाबतीत बोलली जायची तीच एकाधिकारशाहीच्या दुष्परिणामांबाबतची गोष्ट ठाकूर यांच्या कार्यकाळातही चर्चेत असायची. त्या अनुराग ठाकूर यांना अध्यक्षपदात निश्चितच रस आहे. तअध्यक्षपदासाठीचे इच्छुक आहेत राजीव शुक्ला. मात्र, त्यांना मतांची जुळवणी कशी करता येते यावर यश अवलंबून आहे. ठाकूर अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले की श्रीनिवासन हेदेखील पडद्यामागून हालचाली करणार हेही निश्चित आहे.

मनाेहरच अावश्यक
लोढा समितीच्या अहवालाचा योग्य अर्थ समजून घेणे आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी मनोहरसारखीच व्यक्ती अध्यक्षपदी गरजेचे आहे. नाहीतर लोढा समितीच्या शिफारशींची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी होण्याची भीती आहे. ते टाळण्यासाठी बीसीसीआयचे सदस्यच मनोहर यांना आयसीसीवर जाऊ नका, अशी गळ घालण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...