आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashank Manohar Likely To Step Down As Bcci President reports

'एक व्यक्ती एक पद': मनोहर बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडू शकतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शशांक मनोहर बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडू शकतात, अशी क्रिकेट जगतात चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त जस्टिस लोढा समितीच्या शिफारशी लागू कराव्या लागल्या तर विदर्भ क्रिकेट संघटनेचे मत कमी होईल आणि त्यांना अध्यक्षपद सोडावे लागेल. शिवाय आयसीसीमध्येसुद्धा "एक व्यक्ती एक पद'चा नियम लागू आहे.

कुशल प्रशासक आणि स्वच्छ प्रतिमा :
स्वच्छ प्रतिमा असलेले शशांक मनोहर २००८ ते २०११ दरम्यान पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्ष बनले होते. व्यावसायाने वकील असलेले मनोहर मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर पुन्हा अध्यक्ष बनले. अध्यक्ष बनल्यानंतर मनोहर यांनी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळात स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली. डिस्कव्हरी चॅनलवर काम करीत असलेल्या राहुल जौहरीला बीसीसीआयचे पहिले सीईओ म्हणून नियुक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाचा दबाव :
बीसीसीआयवर जस्टिस लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा दबाव आहे. बीसीसीआयमध्ये ‘एक राज्य एक मत’चा नियम लागू व्हावा, असे सर्वोच्च न्यायालयाला वाटते. सध्या महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांतून प्रत्येकी क्रिकेट अाहेत, तर बिहार आणि बऱ्याच पूर्वोत्तर राज्यांचा बीसीसीआयमध्ये प्रवेश नाही.