आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर धवन तीन वनडेला मुकणार; अाॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका रविवारपासून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिखऱ धवन - Divya Marathi
शिखऱ धवन
चेन्नई- अाॅस्ट्रेलियाविरुद्धची मालिका विजयाचे मिशन यशस्वी करण्याचा मानस असलेल्या टीम इंडियाला माेठा धक्का बसला. यजमान भारताचा स्फाेटक फलंदाज शिखर धवन  वनडे मालिकेतील तीन सामन्यांना मुकणार अाहे. त्याची पत्नी अायशाची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे त्याने मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर ताे उर्वरित दाेन वनडे सामन्यात खेळण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. येत्या रविवारपासून  भारत व अाॅस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल.    
 
राहुलला सलामीची संधी
 टीम इंडियाचा युवा खेळाडू लाेकेश राहुलला  वनडे मालिकेत सुपरस्टार खेळाडू राेहित शर्मासाेबत  सलामीची संधी मिळणार अाहे.

सरावादरम्यान फिंच जखमी
अाॅस्ट्रेलिया टीमही अडचणीत सापडली अाहे. टीमचा सलामीवीर अॅराेन फिंच हा सरावादरम्यान जखमी झाला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...