आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर धवनची गोलंदाजी संशयाच्या घेऱ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा हंगामी गोलंदाज ऑफ स्पिनर शिखर धवनच्या गोलंदाजी शैलीवर फ्रीडम कसोटी मालिकेतील फि‍रोझशहा कोटला मैदानावरील चौथ्या व अंतिम कसोटीनंतर संशय व्यक्त होत आहे. त्याला पुढील १४ दिवसांत गोलंदाजीची चाचणी द्यावी लागेल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) म्हटले आहे.

धवनला गोलंदाजी शैलीचा अहवाल येईपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची अनुमती राहील. सामनाधिकाऱ्यांनी अहवाल भारतीय संघ व्यवस्थापनाकडे सोपवला असून धवनच्या आॅफ स्पिन गोलंदाजी शैलीवर संशय व्यक्त केला आहे. शिखरने कोटला कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन षटके टाकली होती.

यांचीही शैली संदिग्ध : धवनशिवाय २०१५ मध्ये संदिग्ध गोलंदाजी शैलीमुळे संशयाच्या कक्षेत अालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये सुनील नारायण (वेस्ट इंडीज), सॅम्युअल्स (वेस्ट इंडीज), हाफिज, बिलाल आसिफ (दोघे पाक), थारिंडू कौशल (झिम्बाब्वे).