आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवी, हेजलसाठी झाला होता \'देवदास\'; रागाच्याभरात डीलीट केला होता मोबाइल नंबर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- बॉलीवुड अॅक्ट्रेस हेजल कीच आणि युवराज सिंहची लव्हस्टोरी पूर्ण फिल्मी आहे. युवराज आणि हेजल येत्या 30 नोव्हेंबरला विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, युवी, हेजलसाठी 'देवदास' झाला होता. अखेर तब्बल साडेतीन वर्षांनंतर हेजलच्या ह्रदयात प्रेमांकूर फुलवण्यात युवी यशस्वी झाला आणि ती स्वत:हून युवीला भेटण्यासाठी आली होती.

युवीने रागाच्याभरात हेजलचा मोबाइन नंबर केला होता डीलीट...
- युवी आणि हेजलची पहिली भेट एका कॅफेत झाली. युवीने तिला 'हाय' म्हटले, पण तिने त्याच्याकडे पाहाले नाही. वेटरला कॉफी ऑर्डर केली.
- हेजलसारखी फोनवर बोलत होती. ती त्याला सारखी टाळत होती.
- हेजलच्या एकूण वतर्वणुकीचा युवीला प्रचंड राग आला होता. त्याने रागाच्याभरात तिचा मोबाइल नंबर डीलीट करून टाकला होता.
- या घटनेला तब्बल साडे वर्षे उलटल्यानंतर दोघांचा कॉमन फेसबुकफ्रेंड युवीला भेटला.
- युवीने त्याला विचारले की, तो हेजलला कसा ओळखतो.
- एकदा भेटलो असल्याचे तो म्हणाला. त्यावर युवी म्हणाला, 'हेजलपासून थोडा दूर राहाशील. तिने मला साडेवर्षे फिरवले आहे. आता मी तिच्यासोबतच ‍संसार थाटणार आहे.!'
- ही बाब हेजलला समजली. तिने फेसबुकवर युवीची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट केली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, युवी आणि हेजलचे इंटरेस्टिंग Facts & Photos...
बातम्या आणखी आहेत...