आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेचा मालिका विजय; झिम्बाब्वेचा २-० ने धुव्वा !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे - कर्णधार रंगना हेराथने (८/६३) धारदार गाेलंदाजीच्या बळावर श्रीलंका संघाला गुरुवारी झिम्बाब्वेवर मालिका विजय मिळवून दिला. श्रीलंका संघाने दुसऱ्या अाणि शेवटच्या कसाेटीत २५७ धावांनी शानदार विजय संपादन केला. विजयाच्या खडतर ४९१ धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेचा दुसऱ्या डावात अवघ्या २३३ धावांत खुर्दा उडाला. झिम्बाब्वेकडून क्रेग इर्विनने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. मात्र, त्याला टीमचा माेठ्या अंतराने झालेला पराभव टाळता अाला नाही.

यासह श्रीलंकेने झिम्बाब्वेविरुद्धची दाेन कसाेटी सामन्यांची मालिका २-० ने निर्विवादपणे अापल्या नावे केली. दुसऱ्या कसाेटीत एकूण १३ विकेट घेणारा श्रीलंकेचा कर्णधार हेराथ सामनावीर अाणि करुणारत्ने मालिकावीरचा मानकरी ठरला. डिसिल्वा (१२७) अाणि गुनारत्ने (११६) यांच्या शतकाच्या बळावर पहिल्या डावात ५०४ धावांचा डाेंगर रचणाऱ्या श्रीलंकेने दुसरा डाव २५८ धावांवर घाेषित केला. झिम्बाब्वेने कालच्या ७ बाद १८० धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. केवळ ५३ धावांची भर घालून झिम्बाब्वेला झटपट गाशा गुंडाळावा लागला.

कर्णधार हेराथचे १३ बळी
श्रीलंकेचा कर्णधार हेराथने शानदार गाेलंदाजी करताना दुसरी कसाेटी गाजवली. त्याने यात एकूण १३ बळी घेतले. यातील पहिल्या डावात त्याने ८९ धावा देताना ५ गडी बाद केले. त्यानंतर अापली ही लय कायम ठेवत त्याने दुसऱ्या डावातही दबदबा निर्माण केला. यामध्ये त्याने ६३ धावा देऊन ८ विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : पहिला डाव : ५०४ धावा, दुसरा डाव : २५८. झिम्बाब्वे : पहिला डाव : २७२ धावा, दुसरा डाव : २३३
बातम्या आणखी आहेत...