आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या, एकमेव टी-20 मध्येही श्रीलंका पराभूत; सोशल मीडियावर आले असे कॉमेंट्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारताने श्रीलंका दौऱ्यावर टेस्ट आणि वनडे सिरीजची प्रत्येक मॅच जिंकल्यानंतर शेवटच्या एकमेव टी-20 सामन्यात सुद्धा श्रीलंकेला पराभूत केले. या दौऱ्यात भारताचा हा सलग 9 वा विजय आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये एखाद्या परदेश दौऱ्यात व्हाईट वॉश करणारी टीम इंडिया जगातील पहिली टीम बनली आहे. या रेकॉर्ड विजयानंतर सोशल मीडियावर इंडियन फॅन्सने जल्लोष केला. श्रीलंकेच्या टीमची मस्करी करताना विविध प्रकारच्या कॉमेंट्स केल्या.
 

अशी होती मॅच
- टी-20 सामन्यात टॉस भारताने जिंकला. तसेच श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजीवर उतरला. 20 ओव्हरमध्ये श्रीलंकेने 7 विकेट गमावून 170 धावा काढल्या. यात दिलशान मुनावीराने 53 आणि प्रियंजनने नाबाद 41 धावा काढल्या. भारताकडून युजवेंद्र चहलने 3 तर कुलदीपने 2 गडी बाद केले. 
- टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाने 22 धावांवर रोहित शर्माची पहिली विकेट गमावली. यानंतर 42 धावांवर लोकेश राहुल आउट झाला. 
- विराट आणि मनीष पांडेय यांनी 119 धावांची पार्टनरशिप करत भारताचा विजय निश्चित केला. विजयाला 10 धावा बाकी असताना विराट बाद झाला. 
- भारताकडून विराट कोहलीने 82 आणि मनीष पांडेयने नाबाद 51 धावा ठोकल्या. टीम इंडियाने 19.2 ओव्हरमध्ये 174 धावा करत विजय मिळवला. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोशल मीडियावर आलेले निवड कॉमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...