आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंकेत महिला क्रिकेटपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी, तीन अधिकारी निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ)

कोलंबो- श्रीलंका महिला क्रिकेटच्या (एसएलसी) तीन अधिकार्‍यांना तकडाफडकी निलंबित करण्यात आले आहे. देशाच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघात निवड केलेल्या क्रिकेटपटूंकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याचा सर्वावर आरोप आहे. दोषी अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी खटलाही चालवण्यात येणार असल्याचे श्रीलंका क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.
एसएलसीनुसार, महिला क्रिकेटपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोन अधिकारी अंतर्गत चौकशीत दोषी आढळून आले आहेत. एका अधिकार्‍यांला गैरवर्तवणुकीप्रकरणी निलंबित करण्‍यात आले आहे.

श्रीलंका कायद्यात लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.

चौकशीसाठी श्रीलंकेची समिती
दरम्यान, गतकाळात क्रिकेट व्यवस्थापनात झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाने चौकशीसाठी एक समिती गठित केली आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्री नवीन दिसाननायके यांनी या समितीबाबतची घोषणा केली. रवी अलगामा, जलिया बोडीनागोडा आणि वारुणा मलीवराआच्ची या तिन्ही वकिलांना या समितीमध्ये अंतर्भूत करून घेण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...