आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lanka Spinner Rangana Herath Retires From ODIs

वनडे, टी-२० मधून श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथची निवृत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - श्रीलंकेचा अनुभवी डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने रविवारी आंतरराष्ट्रीय वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. कसोटी क्रिकेटवर लक्ष देण्यासाठी त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.

३८ वर्षीय हेराथने गत आठवड्यातच श्रीलंका क्रिकेट मंडळाला मर्यादित षटकांच्या आपल्या िनर्णयाबद्दल माहिती दिली होती. मंडळाने त्याचा हा निर्णय मान्य केला आहे. "येत्या आठ महिन्यांत आम्हाला जवळपास १२ कसोटी सामने खेळायचे आहेत. या कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून िनवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. मी युवा खेळाडूंसाठी मार्ग मोकळा केला पाहिजे. यामुळे आम्हाला २०१९ च्या वर्ल्डकपसाठी आतापासूनच संघबांधणी करण्यास मदत होईल,' असे हेराथ म्हणाला. गत काही महिने हेराथ गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. त्याचे श्रीलंकेच्या २०१४ च्या टी-२० जेतेपदामध्ये महत्त्वाचे योगदान होते. त्याने क्वार्टर फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३ धावांत ५ विकेट घेतल्या. ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे.
हेराथची कारकीर्द अशी
- १७ टी-२० सामने : १८ विकेट
- ७१ वनडे : ७४ विकेट