आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छातीवर चेंडू लागल्याने श्रीलंकेच्या क्रिकेटपटूचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - श्रीलंकेच्या २४ वर्षीय क्रिकेटपटू बावलन पथमनाथनचा छातीत चेंडू लागून मृत्यू झाला. तो तिस-या श्रेणीतील ब्रिटिश-तामिळ लीग सामन्यामध्ये मनिपे पॅरिस स्पोर्टस क्लबकडून फलंदाजी करत होता. त्याला तत्काळ किंग्जस्टन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तो वाचू शकला नाही. ज्या गोलंदाजाच्या चेंडूवर त्याचा मृत्यू झाला, त्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्याचे मुळ गाव जाफना होते.

ब्रिटिश-तामिळ क्रिकेट लीगच्या वेबसाइटनुसार पथमनाथनने श्रीलंकेतील जाफना येथील हॉर्टले कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तो इंग्लंडच्या सर्व भागांतील मैदानात खेळला आहे. ईस्ट कोस्ट अॅब्युलन्स सर्व्हिसने म्हटले की, आम्ही दोन अॅब्युलन्स, दोन कार आणि एक एअर अॅब्युलन्स घटनेच्या ठिकाणी पाठवली होती. मैदानातच त्याच्यावर प्राथमिक इलाज करण्यात आला. त्यानंतर दवाखान्यात नेण्यात आले.

पुढे वाचा... वर्षभरात तिघांचा मृत्यू