आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेस्ट सामन्यात श्रीलंकेचे असेही बॅडलक, नो बॉलवर सुद्धा पडली विकेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत विरुद्ध श्रीलंका फायनल टेस्ट सामन्यात पाचव्या दिवशी रविंद्र जडेजाने श्रीलंकेचा चौथा बळी घेतला. जडेजाच्या बॉलवर स्लिपमध्ये उभा असलेला रहाणे याने अॅन्जोलो मॅथ्यूजचा झेल घेतला. या बाबतीत मॅथ्यूज अनलकी ठरला. अंपायरच्या चुकीमुळे तो आऊट ठरवण्यात आला. 

 

नो बॉलवर पडली विकेट
- मॅचचे 22 वे ओव्हर सुरू असताना जडेजाचा चेंडू मॅथ्यूजच्या बॅटला लागला. त्याच ठिकाणी थांबलेल्या रहाणेने त्याला झेलबाद केले. 
- यानंतर भारतीय क्रिकेटर्स जल्लोष करण्यात मग्न झाले. तेवढ्यात मॅथ्यूज शांतपणे आपल्या जागेवरून तंबूच्या दिशेने निघाला. 
- यानंतर दाखवण्यात आलेल्या रीप्लेमध्ये मॅथ्यूज आऊट नव्हताच असे निदर्शनास आले. मॅथ्यूजचा झेल घेतला तो बॉल नो बॉल होता. 
- अंपायर किंवा टीव्हीच्या अंपायरने लक्ष न दिल्याने श्रीलंकेन टीमला एक विकेट गमवावी लागली. मॅथ्यूजने 20 बॉलमध्ये 1 धाव काढला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर फोटोजमध्ये पाहा, नेमके काय घडले...

बातम्या आणखी आहेत...